
India Beats Pakistan Skips Post Match Handshake
Esakal
आशिया कप २०२५ मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवलं. टी२० सामन्यात भारतानं पाकिस्तानवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानचा कर्मधार सलमान अली आगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पाकिस्तानचा संघ १२७ धावाच करू शकला. भारताने हे आव्हान तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवनं सर्वाधिक ४७ धावा केल्या.