Wrestlers Protest: तोडगा निघणार? पुन्हा केंद्र सरकारकडून कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रण

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सरकार कुस्तीपटूंशी चर्चा करण्यास तयार असल्याची दिली माहिती
Wrestlers Protest
Wrestlers Protestesakal

केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती ट्विट करत दिली आहे. क्रीडामंत्र्यांनी ट्वीट केलं की, "सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. यासाठी मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे."(Latest Marathi News)

दरम्यान ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने माध्यमांना माहिती दिली होती, कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची शनिवारी (3 जून) रोजी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्याचंही यावेळी बोलताना बजरंग पुनिया याने सांगितले होते.(Marathi Tajya Batmya)

Wrestlers Protest
Women Wrestlers : 'या' कुस्ती महासंघाचा महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा; पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका

तर सोमवारी (5 जून) कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेऊन रेल्वेतील नोकरीवर परतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.(Latest Marathi News)

तसेच त्यांनी सोमवारी (5 जून) यासंदर्भात एक ट्वीट करत म्हंटलं की, "आमच्या पदकांना 15-15 रुपयांचे म्हणणारे आता आमच्या नोकरीच्या मागे लागलेत. आमचं संपूर्ण आयुष्य दाव्यावर लागलं आहे, त्यासमोर नोकरी ही फार छोटी गोष्ट आहे. नोकरी न्यायाच्या मार्गात अडथळा ठरत असेल, तर तिच्यावर पाणी सोडताना आम्ही सेकंदही विचार करणार नाही. आम्हाला नोकरीची भीती दाखवू नका."(Marathi Tajya Batmya)

Wrestlers Protest
Wrestlers Protest : जंतर मंतरवरील 9 जूनचे खाप आंदोलन स्थगित; राकेश टिकैत म्हणाले कुस्तीपटू सरकारसोबत...

कुस्तीपटू बजरंग पुनिया याने देशवासीयांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com