कडेकोट सुरक्षेमध्येही मेस्सीच्या हॉटेलमधील खोलीत चोरी

जगातील सर्वांत श्रीमंत व मोठा चाहता वर्ग असलेल्या फुटबॉलपटूंपैकी एक असणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या पंचतारांकित हॉटेलमधील खोलीत चोरी झाली आहे
कडेकोट सुरक्षेमध्येही मेस्सीच्या हॉटेलमधील खोलीत चोरी
कडेकोट सुरक्षेमध्येही मेस्सीच्या हॉटेलमधील खोलीत चोरीsakal News

पॅरिस : जगातील सर्वांत श्रीमंत व मोठा चाहता वर्ग असलेल्या फुटबॉलपटूंपैकी एक असणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या पंचतारांकित हॉटेलमधील खोलीत चोरी झाली आहे. चोरट्यांनी त्याच्या हॉटेलमधील खोलीत छतावरून प्रवेश करत दागिने आणि रोख रकमेची लूट केली. अधिक महितीनुसार मेस्सी सध्या पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) क्लबकडून युरोपियन लीगचे सामने खेळण्यासाठी, पॅरिसमधील ‘ले रॉयल मॉन्स्यू’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतो आहे, जिथे हा प्रकार घडला.

कडेकोट सुरक्षेमध्येही मेस्सीच्या हॉटेलमधील खोलीत चोरी
"आता बास झालं" म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार

हॉटेलच्या छतावरून मेस्सीच्या खोलीत प्रवेश करत चोरांच्या या टोळीने लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. पॅरिसमधील या लक्झरी हॉटेलमधील मुक्कामासाठी मेस्सी सध्या प्रति दिवसासाठी २३ हजार डॉलर्स इतकी रक्कम मोजत आहे. मेस्सीने ऑगस्टमध्येच बार्सिलोना सोडलेले असले तरी तो अद्याप पॅरिसमधील त्याच्या घरी गेलेला नाही. या चोरीमध्ये मेस्सीचे सुमारे ४० हजार डॉलर्स किमतीचे दागिने आणि १५ हजार डॉलर्सची रोकड चोरीला गेली आहे. हॉटेल तसेच स्थानिक पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास चालू आहे.

मेस्सी राहायला आल्यानंतर या हॉटेल परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवलेली असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘या घटनेमध्ये सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनात येत आहे. त्याची चौकशी केली जात आहे. या चोरीला अनुभवी टोळी जबाबदार असल्याचे सुचविणारे पुरावेही मिळत आहेत.’ मेस्सी नुकताच बार्सिलोनाला सोडचिठ्ठी देऊन पीएसजीमध्ये सामील झाला आहे.

कडेकोट सुरक्षेमध्येही मेस्सीच्या हॉटेलमधील खोलीत चोरी
IPL 2021 CSK vs SRH Video: पाहा रंगतदार सामन्याचे Highlights
  • २३ हजार डॉलर प्रति दिवसाचे भाडे

  • ४० हजार डॉलरचे दागिने पळवले

  • १५ हजार डॉलरची रोकडही गायब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com