Vinod Kambli Birthday : आकडेच सांगतात! विनोद कांबळी कसोटीत तेंडुलकर, गावसकर यांच्यापेक्षाही...

Vinod Kambli Birthday Test Cricket Records
Vinod Kambli Birthday Test Cricket Recordsesakal

Vinod Kambli Birthday : विनोद कांबळी हे ना ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर एक वादग्रस्त व्यक्तीमत्व येतं. त्याच्या वक्तव्यांची, बेफिकीर वागण्याची कायमच चर्चा होत आली आहे. दारूच्या आहारी गेलाला हा गुणवान खेळाडू काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला. मात्र हा विनोद कांबळी पुन्हा एकदा टीव्हीच्या स्क्रीनवर झळकला. यावेळी त्याच्या टीव्हीवर झळकण्याच्या मागे कोणताही वाद नव्हता तर होती ती हतबलता!

वाढलेली पांढरी दाडी, थकून गेलेला निस्तेज चेहरा अन् वयाच्या पन्नाशीतही साठी पार केल्यासारखा दिसणार विनोद कांबळी पाहून सर्वांचच मन हळहळलं. कधीकाळी ग्लॅमरस आयुष्याची भुरळ पडलेला कांबळी आर्थिक अडचणींच्या गर्तेत अडकला होता. मदतीसाठी विनंती करत होता. समाजातील काही हितचिंतकांनी त्याला मदतीचा हात देत त्याचे आर्थिक चणचण दूरू करण्याचा प्रयत्न केला.

Vinod Kambli Birthday Test Cricket Records
India vs Australia Adam Gilchrist : गिलख्रिस्टने शड्डू ठोकला! म्हणे ऑस्ट्रेलिया 2004 चा करिष्मा पुन्हा करणार

विनोद कांबळी कितीही वादग्रस्त वक्तीमत्व असलं तरी त्याची मैदानावरील गुणवत्ता सचिनच्या तोडीचीच होती. आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित या डावखुऱ्या विनोद कांबळीने बरेच मोठे कारनामे केले आहेत. आज विनोद कांबळीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या क्रिकेटच्या छोट्या पण प्रभावी कारकिर्दितील माईल स्टोरवर नजर टाकू.

- रणजी ट्रॉफीची सुरूवातच षटकाराने

विनोद कांबळीचा स्वॅग हा वेगळाच होता. त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरूवात देखील वेगळ्याच स्वॅगने केली होती. त्याने 1989 मध्ये आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफी सामन्यात षटकार ठोकत कारकिर्दिची सुरूवात केली.

- पाठोपाठ द्विशतकं ठोकणारा अवलिया

1993 च्या फेब्रुवारी - मार्च महिन्यात कांबळीने इतिहास घडवला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाठोपाठ दोन द्विशतके ठोकली. त्यानं पहिलं द्विशतक (224 धावा) हे इंग्लंडविरूद्ध वानखेडे स्टेडियमवर ठोकलं. त्यानंतर दिल्लीत झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात 227 धावा करत दुसरं द्विशतक ठोकलं.

- कसोटीत शतकांची हॅट्ट्रिक

विनोद कांबळीने सलग दोन द्विशतकं ठोकल्यानतर पुढच्याच श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने कोलंबोमध्ये जुलै 1993 मध्ये 125 धावा ठोकल्या. याचबरोबर त्याने सलग तीन कसोटी डावात तीन शतके ठोकण्याची किमया देखील साधली. विशेष म्हणजे ही तीनही शतके इंग्लंड, झिम्बाब्वे आणि श्रीलंका अशा तीन वेगवेगळ्या देशांविरूद्ध ठोकली गेली.

Vinod Kambli Birthday Test Cricket Records
Udayanraje Bhosale : महाराष्ट्र केसरी शिवराजच्या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले, खेळात राजकारण...

- सर्वात वेगवान 1000 कसोटी धावा करणारा विनोद

विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटची सुरूवात धडाकेबाज शतकी खेळींनी केली. त्यामुळे विनोद कांबळीने फक्त 14 कसोटीत आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. भारताकडून सर्वात वेगाने 1000 कसोटी धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

- कसोटीत सर्वाधिक सरासरी राखणारा पठ्ठ्या

विनोद कांबळीची कसोटीमधील धावांची सरासरी ही महान सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर, राहुल द्रविड आणि विरेंदर सेहवाग यांच्यापेक्षा सरस आहे. विशेष म्हणजे फक्त 17 कसोटी सामने खेळलेल्या विनोदने भारताकडून 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कसोटी खेळलेल्या खेळाडूंमध्ये अव्वल सरासरी राखणाऱ्या खेळाडूंमध्येही आपलाच दबदबा निर्माण केला.

विनोद कांबळीने 1993 ते 1995 या दोन वर्षाच्या काळात 17 कसोटी सामने खेळले. इतकीच त्याची कसोटी कारकिर्द राहिली. मात्र त्यात त्याने 54.20 च्या सरासरीने 1084 धावा ठोकल्या. यात 4 शतके, 2 द्विशतके, 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकरची कसोटी कारकिर्द 1989 पासून सुरू झाली अन् 2013 मध्ये संपली. त्यात त्याने 53.78 च्या सरासरीने धावा केल्या. त्यांच्या खालोखाल द्रविडने 5.63 च्या सरासरीने कसोटीत धावा केल्या. तर गावसकर यांनी 51.12 च्या सरासरी राखली होती.

- वाढदिवसादिवशीच ठोकले शतक

विनोद कांबळीने सचिन तेंडुलकर आणि रॉस टेलर यांच्यासारखाच कारनामा 1993 मध्ये केला होता. त्याने 18 जानेवारी 1993 ला आपल्या वाढदिवसादिवशीच इंग्लंडविरूद्ध वनडे सामन्यात शतकी खेळी केली. अशी कामगिरी सचिन तेंडुलकर आणि रॉस टेलर यांनी देखील केली आहे.

आपल्या छोट्याशा कारकिर्दित अनेक मोठे कारानामे करणारा भारताचा डावखुरा शैलीदार फलंदाज आज (दि. 18 जानेवारी 2023) वयाची हाफ सेंचुरी मारत आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विनोद कांबळी!

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com