Virat Kohli Birthday : प्लॅनिंग झालयं! दादाच्या होम ग्राऊंडवर किंग कोहलीचा वाढदिवस होणार दणक्यात साजरा

Virat Kohli Birthday
Virat Kohli Birthday esakal
Updated on

Virat Kohli Birthday : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना हा 5 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना ऐतिहासिक अशा इडन गार्डनवर होणार असून याच दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा वाढदिवस देखील असतो. हा दिवस एकदम खास करण्यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने आपली कंबर कसली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इडन गार्डनवर लेसर शो तसेच आतशबाजी देखील असणार आहे. याच्या जोडीला 70,000 विराट कोहलीचे मास्क देखील प्रेक्षकांना वाटण्यात येणार आहेत.

Virat Kohli Birthday
Inzamam-ul-Haq : इंझमामचा निवडसमिती प्रमुख पदाचा राजीनामा; पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर पहिला धक्का

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी रेव्हस्पोर्ट्सला सांगितले, 'आम्ही विराटसाठी केक ऑर्डर केला आहे. या केकचे डिझाईन हे विराट कोहलीची ओळख सांगणारेच असणार आहे.'

स्नेहाशिष गांगुली पुढे म्हणाले की, 'मी याचा फोटो आताच शेअर करणार नाही. हे एक सरप्राईज असेल. याचबरोबर आम्ही सामन्यादरम्यान विराट आणि प्रेक्षकांसाठी आतशबाजी देखील करणार आहोत. ही आमची विराट कोहलीचा बर्थडे सेलिब्रेट करण्याची पद्धत असले. या सेलिब्रेशनचे कोलकाताचे संपूर्ण प्रेक्षक साक्षीदार असतील. आम्हाला खात्री आहे की स्टेडियम पूर्णपणे विराटच्या चाहत्यांनी पॅक झालेले असेल.'

Virat Kohli Birthday
Maratha Reservation : वर्ल्डकप सामन्यापर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

विराट कोहली आपला 35 वा वाढदिवस हा 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सान्यात खेळून साजरा करणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात विराट कोहलीकडून सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची अपेक्षा त्याचे चाहते करतील हे नक्की!

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com