दीर्घ श्वास घे...नाव सांगून टाक! सेहवागचा साहाला सल्ला

virender sehwag advises wriddhiman saha
virender sehwag advises wriddhiman sahaSakal

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला पत्रकाराकडून मिळालेल्या धमकीवर आता विरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया आली आहे. साहाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकाराने धमकी दिल्याचे समोर आणले होते. पण आता साहाने एक वेगळीच गोष्ट बोलून दाखवलीये. जी विरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) बिलकूल पटलेली नाही. साहाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक आजी माजी क्रिकेटर त्याला पाठिंबा दर्शवत आहे. बीसीसीआय देखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे. पण आता वृद्धिमान साहा त्या पत्रकाराचं नाव सांगण्यास तयार नाही. सेहवागने त्याला नाव सांगण्याचा सल्ला दिला आहे. (Virender Sehwag Advises Wriddhiman Saha On threatened Journalist Matter)

वृद्धिमान साहाने मंगळवारी एक ट्विट केले होते. यात त्याने लिहिले होते की, " माझ्यासोबत जो प्रकार घडला तो अन्य कोणासोबतही घडू नये, असे वाटत होते. त्यामुळेच मी धमकीचा उल्लेख असलेले स्कीन शॉट सोशल मीडियावर शेअर केले होते. पण मी त्याचे नाव जाहीर करणार नाही." एखाद्या व्यक्तिचे करियर संपवण्याचा माझा स्वभाव नाही. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने त्याच्या कुटुंबियाकडे पाहत मी तो पत्रकार कोण होता हे सांगणार नाही, असा उल्लेख त्याने केला होता. पण जर ही गोष्ट पुन्हा घडली तर मात्र मी त्याला सोडणार नाही, असेही साहाने म्हटले आहे.

virender sehwag advises wriddhiman saha
हिजाबसंदर्भातील वादग्रस्त मुद्यावर काय म्हणाला मोहम्मद शमी?

साहाचा हा निर्णय विरेंद्र सेहवागला पटलेला नाही. त्या पत्रकाराचे नाव सांगच असे सेहवागने म्हटले आहे. यासंदर्भात विरुनं ट्विट केलं आहे. त्यात सेहवागने म्हटलं. की, प्रिय रिद्धि, दुसऱ्याला नुकसान पोहचवण्याचा तुझा स्वभाव नाही. तू एक अद्भूत व्यक्ती आहेत. परंतु भविष्यात ही गोष्ट अन्य कोणासोबत घडणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी त्या व्यक्तीचे नाव समोर येणं गरजेच आहे. दीर्घ श्वास घे आणि नाव सांगून टाक, असा सल्ला सेहवागने साहाला दिलाय .

virender sehwag advises wriddhiman saha
VIDEO : शाहिन शाह आफ्रिदीची स्फोटक फलंदाजी, रिअ‍ॅक्शन व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com