
मुंबईतील वानखेडे स्टेडियममधून आयपीएलची जर्सी चोरण्यात आल्याची घटना घडलीय. या प्रकरणी सुरक्षा रक्षकावर चोरीचा आरोप करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलीय. वानखेडे स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्टोअरमध्ये ही चोरी झालीय. ६.५२ लाख रुपये किंमतीच्या २६१ जर्सी चोरी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सुरक्षा रक्षक फारुख असलम खानला अटक केलीय.