World Cup 2023 Semifinal : वादळ वारं सुटलं गो... भारताची सेमी फायनल वॉश आऊट झाली तर काय?

राखीव दिवशी देखील पाऊस आला अन् सामन्याचा निकाल लागला नाही तर काय होणार?
World Cup 2023  India Semifinal
World Cup 2023 India Semifinal esakal

World Cup 2023 India Semifinal Weather Rain : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ची साखळी फेरी आता समाप्तीच्या वाटेवर आहे. यजमान भारत 16 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर दक्षिण अफ्रिकेचे देखील सेमी फायनलमधील स्थान अढळ आहे. ऑस्ट्रेलियानेही आपले अंतिम चार संघातील तिकीट निश्चित केलं आहे.

भारताचा जरी एक सामना शिल्लक असला तरी त्यांचे अव्वल स्थान अबाधित राहणार आहे. ते पॉईंट टेबलमधील चौथ्या क्रमांकाच्या संघासोबत सामना खेळतील. सध्या चौथ्या स्थानावर न्यूझीलंड असून पाकिस्तानला न्यूझीलंडला खाली खेचायचं असेल तर इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात चमत्कार करावा लागेल.

World Cup 2023  India Semifinal
World Cup 2023 Pakistan : एकही चेंडू न खेळता पाकिस्तानची वर्ल्ड कपमधून गच्छंती? जाणून घ्या गणित

त्यामुळे 15 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होईल हे जवळपास निश्चित आहे. गुणतालिकेत एखाद्या वेळेस ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील नंबर वर खाली होऊ शकतो. मात्र 16 नोव्हेंबरला कोलकात्यात हे दोन संघ सेमी फायनलमध्ये भिडतील.

भारताची सेमी फायनल ही महाराष्ट्रात होत आहे. सध्या महाराष्ट्रातील हवामान हे वादळी झालं आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे भारताच्या (Team India) सेमी फायनलवर देखील पावसाचे सावट असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर सामना पावसामुळे वॉश आऊट झाला तर काय हा प्रश्न क्रिकेट रसिकांना भेडसावत आहे.

World Cup 2023  India Semifinal
PAK vs ENG World Cup 2023 : बाबर आझम अजूनही प्रचंड आशावादी! सेमी-फायनलमध्ये जाण्यासाठी मोठा 'प्लॅन'

आयसीसीचा नियम काय सांगतो?

सेमी फायनलला आयसीसीने पावसापासून वाचण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दिली आहे. दोन्ही सेमी फायनलसाठी प्रत्येकी एक एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तरी देखील राखीव दिवशी देखील जर पावसामुळे डकवर्थ लुईस नियम लागू होण्यापर्यंतच्या षटकांचा खेळ झालाच नाही तर काय हा प्रश्न उरतोच.

अशा परिस्थिती जर राखीव दिवशी देखील सामन्याचा निकाल लागू शकला नाही आणि सामना वॉश आऊट झाला तर जो संघ साखळी फेरीतील गुणतालिकेत वरच्या स्थानावर होता तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. या नियमानुसार भारतीय संघ फायनल गाठेल.

World Cup 2023  India Semifinal
Babar Azam : पाकिस्तान संघात मोठा भूकंप! वर्ल्ड कपनंतर बाबर आझम कर्णधारपदाचा देणार राजीनामा

दक्षिण अफ्रिका - ऑस्ट्रेलियाचं काय?

दुसरीकडे दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनलमध्ये जो संघ दुसऱ्या स्थानावर असेल तो संघ अंतिम सामना खेळले. सध्याच्या घडीला दक्षिण अफ्रिका 9 सामन्यात सात विजयासह 14 गुण आणि +1.261 नेट रनरेट राखत दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया आज आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे.

त्यांचे 8 सामन्यात 6 विजयासह 12 गुण झाले आहेत. बांगलादेशविरूद्धचा आजचा सामना जिंकून ते गुणांच्या बाबतीत दक्षिण अफ्रिकेची बरोबरी करू शकतात. मात्र त्यांचे रनरेट हे +0.861 इतके असल्याने ते तिसऱ्या स्थानावरच राहण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com