Instagram च्या एका पोस्टमधून Virat Kohli कमावतो 5 कोटी

Virat Kohli Vamika
Virat Kohli Vamika esakal

टीम इंडिया (Team India) चा स्टार खेळाडू आणि कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जगभरातील श्रीमंत क्रिकेटपैकी एक आहे. बीसीसीआय (BCCI) कडून त्याला वर्षाला 7 कोटीच पॅकेज मिळत. कारण तो एप्लस ग्रेडमध्ये आहे. त्याच्याशिवाय रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह ही मंडळी देखील याच गटात मोडतात.

विराट कोहलीची एकूण कमाई किती?

विराट कोहली (Virat Kohli) बीसीसीआय (BCCI) कडून मोठं पॅकेज मिळतच. त्याच्याशिवायही अन्य काही गोष्टीतून त्याची मोठी कमाई सुरु असते. 'किंग कोहली' वेगवेगळ्या ब्रँडशी संलग्नित असून या माध्यमातून देखील तो कोट्यवधी कमावतो. DNA च्या एका वृत्तानुसार त्याची एकूण कमाई 60 मिलियन यूएस डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात ही रक्कम विराट कोहलीची वर्णी अब्जाधीशांच्यात करते.

इंस्टाग्राममधून कोट्यवधीची कमाई

विराट कोहली (Virat Kohli) च्या उत्पनाचं इंस्टाग्राम हे देखील एक साधन आहे. इन्स्टावर त्या 177 मिलियन फॉलोअर्स आहेत. टीम इंडियाचा कसोटी कॅप्टनला एका प्रमोशनल पोस्टसाठी जवळपास 5 कोटी रुपये मिळतात.

Virat Kohli Vamika
लंबूजी ईशांतच्या प्रेमाचा किस्सा; बास्केट बॉलच्या मैदानातून फुलली प्रेम कहाणी

प्रियांका चोप्राची इंस्टाग्रामवरील श्रीमंतीही थक्क

विराट कोहली (Virat Kohli) शिवाय बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोपड़ा (Priyanka Chopra) ही देखील लोकप्रिय इंस्टाग्रामवर मोठी कमाई करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या इन्स्टा प्लेटफॉर्मवर तिचे 72.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. प्रियांका एका प्रमोशनल पोस्टला 3 कोटी रुपये घेते..

Virat Kohli Vamika
कांगारुंच्या तावडीतून 'लायन्स'ची सुटका कोण करणार?

रोनाल्डोचा नाद खुळा!

इन्स्टावर सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम हा पोर्तुगालचा फुटबॉल स्टार (Portugal) ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) नावे आहे. त्याचे इन्स्टावर 387 मिलियन फॉलोअर्स आहेत. एका प्रमोशनल पोस्टसाठी तो 1,604,000 अमेरिकी डॉलर कमावतो. WWE चॅम्पियन ड्वेन 'द रॉक' जॉनसन (Dwayne 'The Rock' Johnson) आणि सिंगर-एक्ट्रेस अरियाना ग्रान्डे (Ariana Grande) ही मंडळी रोनाल्डोच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com