esakal | भरतनाट्यम स्टाइल बॉलिंग करतोय खेळाडू; VIDEO VIRAL
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket_Viral_Video

हा मजेदार व्हिडिओ भारताचा माजी स्टार खेळाडू युवराज सिंगने पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

भरतनाट्यम स्टाइल बॉलिंग करतोय खेळाडू; VIDEO VIRAL

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ जरी नसला तरी त्याला धर्म मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. क्रिकेटचा देव असणारा सचिन तेंडुलकरही याच मातीतला. जगातिक दर्जाचे अनेक खेळाडू या भारतभूमीत तयार झाले. सध्या सोशल मीडियात अशाच एका क्रिकेट खेळाडूची चर्चा रंगताना दिसत आहे.

हा खेळाडू लोकप्रिय होण्यामागचं कारण आहे त्याची हटके बॉलिंग स्टाईल. हा खेळाडू भरतनाट्यम नृत्य करत बॉलिंग करत असल्याचे व्हिडिओत दिसत असून या बॉलिंग प्रकाराला भरतनाट्यम स्टाईल असं नाव देण्यात आलं आहे. 

गिफ्टच्या षटकाराचा 'आनंद'; सहा खेळाडूंसाठी 'महिंद्रा' यांचा मास्टर स्ट्रोक​

विशेष म्हणजे हा मजेदार व्हिडिओ भारताचा माजी स्टार खेळाडू युवराज सिंगने पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. युवराजला हा व्हिडिओ खूप पसंतीस पडला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने हरभजन सिंगला टॅग केलं आहे. 

बॉलिंगसाठी जेव्हा तो रन-अप घेतो त्यावेळी गोल फिरत फिरत येऊन तो बॉल फेकत आहे. त्यामुळे बॅट्समनही चांगलेच चक्रावत आहेत. तो बॉल टोलवायचा की हसू आवरायचं हाच प्रश्न बॅट्समनना पडलाय. युवराज हा विचित्र रनअप पाहून आश्चर्यचकित झाला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, भरतनाट्यम स्टाइल ऑफ स्पिन, काय म्हणतोस हरभजन सिंग?

पुजारानं केलाय असाही पराक्रम; टी20 मध्ये झळकावलं होतं शतक!

गेल्या आठवड्यात युवराजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला साडेतीन लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनाही हा व्हिडिओ चांगलाच आवडत आहे. 

एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, 'हा व्हिडिओ पाहून मला लगान चित्रपटाची आठवण झाली. भूरा यापेक्षा चांगली बॉलिंग करतो.' दुसऱ्याने म्हटले आहे, गोकुळधाम प्रीमियर लीगचं नाव ऐकलं आहे का? तर आणखी एका नेटकऱ्यानं त्याला शक्तिमान बॉलिंग करत असल्यासारखं दिसत आहे. 

- क्रीडाविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)