Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला एवढ्या किंमतीत खरेदी करा सोन्याची साडी!

म्हणून तर म्हणतात पैठणीची बातच न्यारी
Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023 esakal

 Akshaya Tritiya 2023 :  

हे सुंदरा
जलपरी फार लाजरी, प्रीतबावरी, लाविते छंद
भरजरी शालू अंजीरी, मदन मंजिरी, फिरे स्वच्छंद
रतीरूप अजिंठा शिल्प, कोरिले कुणी, उभी सत्कारा…हे सुंदरा….

साडी नेसलेल्या प्रत्येकीला पाहुन तिच्या जोडीदाराचं मनही असंच गाणं गुणगुणत असेल. म्हणून तिला एखाद्या खास प्रसंगी साडीही गिफ्ट करावीशी वाटत असेल. लग्नाचा वाढदिवस, घरातील शुभकार्य, एखादा मोठा सण महिला वर्गाची साड्यांची खरेदी काही थांबत नाही.

Akshaya Tritiya 2023
Saree Patterns : गिरीजाच्या साड्या फूल क्लासी, बायका करतात फॅशनची कॉपी

आज अक्षय तृतीया आहे. आजच्या शुभमुहूर्ताला सोन्याचे अनेक स्पेशल दागिन खरेदी केले जातात. दागिने वस्तू यांची खरेदी गेल्या वर्षी झाली असेल. तर आज आपण भारतातील सोन्यापासून बनलेली एक खास गोष्ट खरेदी करण्याबद्दल बोलुयात.

भारतात अनेक वर्षांपासुन सोन्यापासून बनलेली वस्त्रे परिधान केली जातात. राजे महाराज यांची आभुषणे, त्यांचे वस्त्रही सोन्यापासून बनवले जात होते. त्याच धर्तीवर आज आपण सोन्यापासून कोणकोणत्या साड्या बनवल्या जातात. त्यांची खासियत आणि त्यांची किंमत किती याबद्दल माहिती घेऊया.

Akshaya Tritiya 2023
Saree in Summer : उन्हाळ्यात कोणत्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात?

पैठणी 

पहिली आहे महाराष्ट्राची शान असलेली आणि पदरेशात जाऊन पोहोचलेली येवल्याती सोन्याच्या जरीपासून तयार होणार पैठणी. प्रत्येक महिलेला आयुष्यात एकदा तरी पैठणी घ्यावी आणि कार्यक्रमात मिरवावी, असे वाटत असते. कारण खऱ्या पैठणीची बातच काही न्यारी असते.

पैठणी हाताने बनवली जाते. तिला बनवण्यासाठी ५ महिन्याचा कालावधी लागतो. त्यासाठी पदरावर मोराची नक्षी आणि जरीसाठी सोने वापरले जाते.

मध्यंतरीच्या काळात होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात सोन्या, हिऱ्यांनी नटलेली ११ लाखांच्या पैठणीची चर्चा होती. पण तुम्हालाही पैठणी घ्यायची असेल. तर ती ११ हजार ते १ लाखापर्यंत तिची किंमत आहे.

Akshaya Tritiya 2023
Saree in Summer : उन्हाळ्यात कोणत्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात?
११ हजार ते १ लाखापर्यंतची पैठणी
११ हजार ते १ लाखापर्यंतची पैठणीesakal

सोन्याच्या जरीची बनासरी सिल्क साडी

पैठणीनंतर बनारसी सिल्क साडीचा नंबर लागतो. अस्सल सोने वापरून बनवलेल्या या साडीला अनेक महिलांच्या हृदयात स्थान आहे. गोल्डन सिल्क मधली ही साडी दिसायला आकर्षक आहे. तसेच त्यावर सोनेरी जरी असलेली कांचीपुरम डिझाइन आहे. ही साडी दिसायला खूप सुंदर आहे आणि कोणत्याही खास प्रसंगी आणि लग्न समारंभात नेसायलाही योग्य आहे. या साडीची किंमत ६९ हजार आहे.

Akshaya Tritiya 2023
Sonalee's Saree : सोनालीच्या साड्यांनी बायकांना लावलं वेड, बघा फोटो
कांचिपुरम साडी आजकाल सगळ्याच महिलांना आवडू लागलीय
कांचिपुरम साडी आजकाल सगळ्याच महिलांना आवडू लागलीयesakal

४० हजाराची कोटा डोरिया साडी

राजस्थानच्या कोटा येथे बनवलेल्या कोटा डोरिया साड्यांनी देशात आणि राज्यात तसेच जगात आपली ओळख निर्माण केली आहे. कोटापासून 15 किमी अंतरावर असलेल्या कैथूनमध्ये या साड्या हाताने बनवल्या जातात. कोटा डोरिया साडीचा इतिहास 100 वर्षांहून अधिक जुना आहे. म्हैसूरमधील काही कुटुंबांनी कैथूनमध्ये कोटा डोरिया साड्या बनवायला सुरुवात केली आणि ती कालांतराने वाढत गेली.

कोटा डोरिया साडीची खास आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तयार करण्यासाठी कोणत्याही मशीनचा वापर केला जात नाही. हे पूर्णपणे हाताने तयार केले जाते. कोटा व्यवसायात सुमारे 3500 पिटलूम (हातमाग) आहेत, त्यापैकी 3000 एकट्या कैथून शहरात आहेत. तर जवळच्या 12 गावांमध्ये 500 हातमाग आहेत. येथे दररोज 400 ते 500 साड्या बनविल्या जातात.

कोटा डोरिया साड्या वजनाने हलक्या असतात. ते तयार करण्यासाठी खऱ्या रेशमाबरोबरच सोने आणि चांदीचा वापर केला जातो. साध्या साडीपासून डिझायनर साडी बनवायला वेगळा वेळ लागतो. साध्या साडीची किंमत 1500 रुपयांपासून सुरू होते. तर डिझायनर साडीची किंमत 15 ते 40 हजारांपर्यंत आहे. त्याचबरोबर अनेक साड्या लाखो रुपयांना विकल्या जातात.

Akshaya Tritiya 2023
Amruta's Saree : अमृताची साडी चॉईस लई भारी, बघा तिच्या भारी साड्या
४० हजाराची आहे ही खास हातमागावर विणलेली कोटा साडी
४० हजाराची आहे ही खास हातमागावर विणलेली कोटा साडीesakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com