Anant-Radhika Pre-Wedding: अनंत अंबानींच्या लग्नाला मराठमोळा टच, पाहुण्यांना देणार पैठणी-बांधणी दुपट्टा

तीन महिने आधी वरमाई निता अंबानी स्वत: गुजरातच्या या कारागिरांना भेटल्या होत्या
Anant-Radhika Pre-Wedding
Anant-Radhika Pre-Weddingesakal

Anant-Radhika Pre-Wedding:

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी, नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी...कवयित्री शांता शेळके यांनी पैठणीचे स्त्रीजनात असलेले हळवे स्थान मोजक्या शब्दांत सुंदरपणे वर्णन केले आहे.

पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्रप्रकार. साड्यांनी कपाट भरलेले असले तरी मनाच्या व कपाटाच्या आतल्या कप्प्यात पैठणीचे स्थान अबाधित आहे. अशी ही पैठणी आता पुन्हा चर्चेत आली आहे. त्याच कारण आहे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचं लग्न. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा ३ मार्च ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Anant-Radhika Pre-Wedding
Anant Radhika Pre Wedding : अनंत-राधिकाच्या प्रीवेडिंग! मुंबई इंडियन्सचा 'माजी' कर्णधार रोहितही पोहचला जामनगरमध्ये

अनंत आणि राधिका यांचा प्री-वेडींग सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना एक स्पेशल गिफ्ट देण्यात येणार आहे. गुजरातमधील कारागिरांनी गुजरात आणि महाराष्ट्राची संस्कृती एकत्रित केली आहे. कारण, या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना गुजरातची ओळख असलेली बांधणी आणि महाराष्ट्राची शान असलेली पैठणी यांचे एकत्रीकरण करण्यात आलं आहे.

प्रि-वेडींग सोहळ्याच्या तीन महिने आधी वरमाई निता अंबानी स्वत: गुजरातच्या या कारागिरांना भेटल्या होत्या. तेव्हा त्यांनीच ही आयडिया सुचवली होती. गुजरातच्या ओढणीला महाराष्ट्राचा टच देण्याचा हा विचार कसा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर, त्याच उत्तर असं आहे की, अंबानी कुटुंबाची जन्मभूमी गुजरात अन् कर्मभूमी महाराष्ट्र या दोन्ही गोष्टी लक्षात ठेऊन हे दुपट्टे डिझाईन केले गेले आहेत.

Anant-Radhika Pre-Wedding
Anant-Radhika Pre-Wedding: "ये तो रब ने बना दी जोडी...";  अनंत बोलत असताना मुकेश अंबानींना अश्रू अनावर, नेमकं काय घडलं? 

आणखी एक स्पेशल कारण म्हणजे, निता अंबानी पैठणीवर जास्तच प्रेम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा पैठणीच्या कारागिरांशी चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा त्यांचे अस्सल मराठी उच्चार ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

हे दुपट्टे तयार करणाऱ्या कारागिर माजेथिया म्हणाल्या की, बांधणी वर्क असलेल्या दुपट्ट्याला पैठणी काठ जोडण्याची आयडिया निताजींची होती. आम्ही अनेक प्रकारचे दुपट्टे त्यांना दाखवले. पण त्यांना काहीतरी वेगळं हवं होतं. जे पाहताच क्षणी पसंत पडावं असं असेल. अखेर त्यांनीच पैठणी-बांधणी दुपट्टा सुचवला.

Anant-Radhika Pre-Wedding
Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशी आणि भगवान श्रीविष्णूंचा आहे थेट संबंध, आजच्या दिवशी करा हा उपाय, अडचणी होतील दूर   

या लग्नासाठी आम्हाला कारागिर वाढवावे लागले. कारण, कमी वेळात आम्हाला ४०० दुपट्टे तयार करून द्यायचे होते. पण आम्ही ते वेळेत पुर्ण करू शकलो, यात आम्हाला आनंद आहे, असेही त्या म्हणाल्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com