Andhra Pradesh : दक्षिण भारतातले काश्मिर, बर्फात खेळण्याचा आनंद घ्यायचाय तर इथं गेलंच पाहिजे

म्हणून या गावाला दक्षिणेचे 'काश्मीर' म्हटले जाते
Andhra Pradesh
Andhra Pradeshesakal

Andhra Pradesh :  

हिवाळ्यात फिरण्याची खरी मजा लुटण्यासाठी लोक काश्मिरला जाण्याचे प्लॅनिंग करतात. काश्मिर पट्ट्यात गेलं की  डलहौसी, मनाली, कुल्लू आणि शिमला इथेही पर्यटकांची गर्दी होते. नवं लग्न झालेले कपल्स हनीमूनसाठी काश्मिरलाच पसंती देतात. उबदार कपडे घालून बर्फाच्छादीत रस्त्यांवर जोडीदाराचा हात पकडून सोबत टाकलेली ती पावले नेहमी लक्षात राहतात.  

सर्वांना काश्मिरला जाणं परवडत नाही. अशा लोकांना दक्षिण भारतातही बर्फवृष्टीचा आनंद घेता येईल? बर्‍याच वेळा, फ्रेश बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी दुर्गम दक्षिण भारतातील शहरातून उत्तर भारतात जाणे शक्य नसते. पण दक्षिण भारतातही तुम्ही फ्रेश हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता.


आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यात वसलेले लांबसिंगी गाव आहे. ज्याला दक्षिणेचे काश्मीर म्हटले जाते. हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 1024 मीटर उंचीवर वसलेले आहे. उंचीमुळे या गावात हिवाळ्यात तापमान शून्याच्या खाली पोहोचते. या कारणास्तव या गावाला दक्षिणेचे 'काश्मीर' म्हटले जाते.

Andhra Pradesh
Tourism News: थेट नववर्षापर्यंत पर्यटनाचा धमाका! केदारनाथ, बद्रिनाथ, अयोध्येसाठी बुकिंग

येथील तापमान सामान्यतः कमाल ३२° सेल्सिअस ते किमान ६° पर्यंत असते. काहीवेळा ते ०° सेल्सिअसच्या खालीही जाते. हिवाळा ऐन भरात असताना उत्तर भारतात थंडीच्या लाटेच्या बातम्या सर्रास येतात.

सूर्यच उगवत नाही

यावेळी अनेक दिवस सूर्य उगवत नाही. तसेच लांबसिंगी गावातही हिवाळ्यात अनेक दिवस सूर्य उगवत नाही.  ज्या दिवशी सूर्यदर्शन होतो त्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच येथे सूर्य दिसतो, त्यामुळे स्थानिक आदिवासी समाजातील लोकांना त्यांच्या दैनंदिन कामात खूप अडचणी येतात.


पार्क स्ट्रीट ते सेंट पॉल कॅथेड्रल चर्च

ख्रिसमसच्या दिवशी कोलकातामधील ही ठिकाणे एक्सप्लोर करा. यामुळेच या गावाला कोरा ब्यालू असेही म्हणतात. स्थानिक भाषेत कोर्रा म्हणजे काठी आणि बायलू म्हणजे घराबाहेर. म्हणजेच हिवाळ्यात कोणी घराबाहेर राहिल्यास तो काडीसारखा कडक होईल.

Andhra Pradesh
Tourism : दिवाळीच्या सुटीत पर्यटनांवर ‘होऊ देत खर्च’!

लांबसिंगीला भेट देण्याची उत्तम वेळ

लांबसिंगी गावाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी. यावेळी, हिवाळा तीव्र असतो आणि येथे तापमान शून्याच्या जवळ पोहोचते. येथे दरवर्षी बर्फवृष्टी होत नसली तरी जेव्हाही ती येते तेव्हा ती डिसेंबर ते जानेवारी दरम्यानच होते.

हिमवर्षाव व्यतिरिक्त, तुम्ही येथे धुके असलेले पर्वत, हिरवळ आणि शांत वातावरणाचा नक्कीच आनंद घ्याल. लांबसिंगीला येणारे पर्यटक इथून कॉफी आणि काळी मिरी नक्कीच विकत घेतात, जी इथे मोठ्या प्रमाणावर पिकवली जातात. अलिकडच्या वर्षांत, सफरचंद देखील मोठ्या प्रमाणात घेतले जातात.

इको टुरिझम विकसित होत आहे

गेल्या काही वर्षात या गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथे छोटी हॉटेल्स बांधली जात आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळ (APTDC) ने येथे रिसॉर्ट्स देखील बांधले आहेत, जिथे पर्यटकांना खूप चांगले पॅकेज उपलब्ध करून दिले जाते.

विशाखापट्टणम किंवा आसपासच्या शहरांमध्ये येणारे पर्यटक काही काळ राहण्यासाठी आणि दक्षिण भारतातील या काश्मीरच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यासाठी येथे येऊ लागले आहेत.

Andhra Pradesh
Chh. Sambhaji Nagar Tourism : बोटिंगसोबत नववर्षात घ्या मिनी ट्रेनचा आनंद

लंबासिंगीला कसे पोहोचायचे

लांबसिंगीला सर्वात जवळचे विमानतळ विशाखापट्टणम आहे, जे सुमारे 107 किमी अंतरावर आहे. विशाखापट्टणम ते लंबासिंगी पर्यंत सरकारी आणि खाजगी बस सेवा उपलब्ध आहेत जी तुम्हाला थेट लंबासिंगीला घेऊन जातील. लांबसिंगीमध्ये दरवर्षी बर्फवृष्टी होत नाही आणि इथे कधी बर्फ पडेल हे कोणालाच माहीत नाही.

जर तुम्ही भाग्यवान असाल तर दक्षिण भारतातील या गावात तुम्हाला यावर्षी बर्फवृष्टीचा आनंद घेण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

Andhra Pradesh
Jharkhand Tourism : झारखंडमध्ये फिरण्याचे अनेक ऑप्शन्स, एक्सप्लोर करा आणि ट्रिप अविस्मरणीय बनवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com