Astro Tips : कबुतराचे पंख देतात शुभ संकेत; दारिद्र्य करतात दूर!

निसर्गाच्या सानिध्यात राहिलेल्या वस्तू, झाडाची पाने, पक्षांचे पंख घरी ठेवणे चांगले असते.
Astro Tips
Astro Tips

आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टींचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो.पुर्वीपासुनच पशु, पक्षी, झाडे, निसर्ग या गोष्टी आपल्याला सकारात्मक रहायला शिकवतात. निसर्गाच्या सानिध्यात राहिलेल्या वस्तू, झाडाची पाने, पक्षांचे पंख घरी ठेवणे चांगले असते. कबुतराची पिसे घरात सुख-समृद्धी आणतात. वास्तूशास्त्रानुसार कबुतराचा वावर घरी असणे शुभ असते. (Astro tips pigeon feather)

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, कबुतराची पिसे घरी ठेवल्याने कर्जापासून मुक्ती होते. पैशाची कमतरता यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते. यामुळे घरात आणि कुटुंबात सकारात्मक उर्जा निर्माण होते. आज जाणून घेऊयात कबुतराचे पंख घरी ठेवल्याने काय फायदे होतात.

Astro Tips
Astro Tips for Money : हे उपाय केल्याने घरात येईल पैसाच पैसा

कोठे ठेवावे कबुतराचे पिस

वास्तुशास्त्रानुसार, कबुतराचे पिस घरातील दारिद्र्य दूर होते. कबुतरांना देवांचे दूत म्हटले जाते. कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात कबुतराची पिसे ठेवावी.

लिव्हींग रूमच्या दक्षिण कोपऱ्यात, किचनच्या उत्तरेला आणि बेडरूमच्या पूर्वेकडील कोपऱ्यात कबुतराचे पंख ठेवावे. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. पण, हे पंख कोणाच्याही नजरेस पडणार नाहीत असे ठेवावेत.

कबुतराचे पंख हे संकेत देतात

  • घरामध्ये कबुतराने अंडी घातली असल्यास एखादी चांगली बातमी मिळू शकते, असे शास्त्र सांगते.

  • पांढऱ्या किंवा लाल कपड्यात कबुतराचे पंख गुंडाळून जाप केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. घरात कधीही गरिबी येत नाही.

  • व्यवसायात फायदा मिळवण्यासाठी कबुतराचे पंख हळदीने पिवळ्या केलेल्या काडीसोबत पिवळ्या कापडात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे व्यवसायात फायदा होतो. पैशाची कमतरता दूर होईल.

Astro Tips
एसी सुरू करताना 'हे' बदल करा, चक्क अर्धे वीज बिल येणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com