esakal | रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे १३ आयुर्वेदिक मार्ग

बोलून बातमी शोधा

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे १३ आयुर्वेदिक मार्ग

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे १३ आयुर्वेदिक मार्ग

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूवर जर मात करायची असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये जास्तीत जास्त सकस व पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. त्याचसोबत आयुर्वेदात अशा काही पद्धती आणि उपाय आहेत, ज्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते. म्हणूनच आज अशा काही गोष्टी जाणून घेऊ ज्या शरीरासाठी लाभकारक ठरतील.

१. सकाळी उठल्यानंतर व्यायाम (सूर्यनमस्कार), प्राणायाम, मेडीटेशन (ध्यान) करावे.

२. सकाळ व संध्याकाळी कोमट पाण्यात हळद आणि सैंधव मीठ घालून गुळण्या कराव्यात यामुळे घशातील खवखव कमी होते.

३.रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज १ तुळशीचं पान चावून खा.

४. सकाळी च्यवनप्राशचे सेवन करू शकता कारण त्यात आवळा असल्याने natural vit c ची पूर्तता होते जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरजेचं आहे.

हेही वाचा: आहारात करा ५ पदार्थांचा समावेश; होणार नाहीत लशीचे साईड इफेक्ट्स

५. घरा बाहेर पडताना किंवा घरात असताना देखील नाकाला आतून खोबरेल तेल/तीळ तेल किंवा गाईचे तूप लावावे.

६. वातावरण शुध्द ठेवण्यासाठी कडूनिंबाची पाने, हळद, वेखंड, लसूण पाकळ्या, ओवा, गुग्गुळ, कापूर यापैकी जे असेल ते द्रव्य तव्यावर / विस्तावावर भाजून धूनी करावी.

७. सर्दीसारखी काही लक्षणे असल्यास गरम पाण्यात पुदिनाची पानं, ओवा टाकून त्याची वाफ घ्यावी.

८. खोकला असल्यास लवंग+ मध किंवा हळद+ मध दिवसातून २-३ वेळा चाटावा. मध हे श्वसन संस्थेवर काम करणारं अत्यंत महत्त्वाचं औषध आहे.

हेही वाचा: पेन किलर घेऊ नका! सध्याच्या काळात ठरु शकतं घातक

९. तुलसी, दालचिनी, सुंठ, लवंग, काळ्या मनुका, काळेमिरी अशी द्रव्ये प्रकृतीनुसार कमी अधिक प्रमाणात वापरून त्याचा हर्बल चहा प्यावा.

१०. ४ चमचे गाईचे तूप उपाशीपोटी किंवा जेवणात मिसळून खावे. हे उत्तम विषघ्न आहे.

हेही वाचा : Coronavirus : घरकामासाठी माणसं घरी येतायेत? मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

११. दुधात हळद व सुंठ टाकून उकळवून ते पिऊ शकता.

१२. कफ वृध्दी होऊ नये, सर्दी किंवा घशाचे विकार होऊ नयेत यासाठी थंड, स्निग्ध, तळलेले पदार्थ खाऊ नयेत व दिवसभर कोमट पाण्याचे सेवन करावे.

१३.कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी देखील गुडूची, अश्वगंधा, बला यासारख्या अनेक औषधांचा वापर करून आपण स्वास्थ्य टिकवून ठेवू शकतो.

( डॉ.रूपाली नाईक या वेदिक्युअर हेल्थकेअर ॲण्ड वेलनेसच्या आयुर्वेदाचार्य आहेत.)