Back Pain Remedies : पाठ एवढी दुखते की सकाळी उठताच येत नाही? हे उपाय करा फरक पडेल

पाठ दुखीवर पेन किलर गोळ्या घेणं सोप्प असलं, तरी त्याचे परिणाम नंतरच्या काळात भोगावे लागू शकतात
Back Pain Remedies
Back Pain Remediesesakal

Back Pain Remedies :

पाठदुखीची समस्या आजकाल सामान्य आहे. पाठदुखीची अनेक कारणे आहेत. वाढत्या वयामुळे, धकाधकीच्या जीवनामुळे किंवा खूप व्यायामामुळे लोकांमध्ये पाठदुखीची समस्या वाढत आहे. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की सहन करणे कठीण जाते.

पाठदुखी हे एका विशिष्ट ठिकाणी होणाऱ्या वेदना संपूर्ण पाठीत पसरवतात. कधीकधी वेदना कंबरेपासून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते, जसे की नितंब, पाय किंवा पोट यामुळे वेदना होऊ शकतात.

पाठ दुखीवर पेन किलर गोळ्या घेणं सोप्प असलं तरी त्याचे परिणाम नंतरच्या काळात भोगावे लागू शकतात. म्हणून काही सोपे आणि घरगूती उपाय करून तुम्ही पाठदुखीपासून मुक्त होऊ शकता.

Back Pain Remedies
Lower Back Pain: ऑफ‍िसमध्ये तास-न्-तास बसून काम केल्यानं दुखतेय पाठ? मग हे सोपे व्यायाम नियमित करा!

कधीकधी पाठदुखीमुळे उठणे,बसणे,चालणे कठीण होते. अशा परिस्थितीत, काही प्रभावी घरगुती टिप्सच्या मदतीने तुम्ही पाठदुखीपासून आराम मिळवू शकता.

तेलाने मसाज करा

पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तेलाने मसाज करणे सर्वात प्रभावी आहे. यासाठी मोहरीचे तेल वापरा, मोहरीच्या तेलात लसूण पाकळ्या टाका, नंतर गरम करा. आता याने प्रभावित भागात मसाज करा, यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

योग्य स्थितीत बसा

अनेक वेळा, योग्य स्थितीत न बसल्याने पाठदुखी होऊ शकते. त्यामुळे नेहमी योग्य मुद्रेत बसण्याचा प्रयत्न करा. बसताना, आपली पाठ सामान्य स्थितीत ठेवा आणि आपले डोके आणि खांदे सरळ ठेवा. (Home Remedies)

Back Pain Remedies
Back Pain In Men : बहुतांश पुरुषांमध्ये तिशीनंतर का होते पाठदुखी सुरू? जाणून घ्या

कोमट पाणी आणि नीलगिरीचे तेल

कोमट पाण्याच्या बादलीमध्ये निलगिरीचे काही थेंब टाका आणि या पाण्याने आंघोळ करा. यामुळे कंबरदुखीसोबतच अंगदुखीपासूनही आराम मिळेल. यातून तुम्हाला तणावमुक्त वाटेल.

व्यायाम

शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही फिरायला जाता आणि काही स्ट्रेचिंग करता तेव्हा ते एंडोर्फिन सोडते, ज्यामुळे वेदना कमी होते.

Back Pain Remedies
Yoga Tips For Back Pain : पाठदुखीसाठी योगा करण कीती योग्य?

गरम पाण्याचा शेक

पाठ दुखत असल्यास त्या जागेवर गरम पाण्याची पिशवी, अथवा गरम लावून तुम्ही सूज कमी करू शकता. पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल वापरू शकता. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळू शकतो.

हळद आणि दूध: गरम दुधाच्या ग्लासमध्ये चिमूटभर हळद आणि मध मिसळा. याचे नियमित सेवन केल्याने पाठदुखी तसेच खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो.

Back Pain Remedies
Back Pain Relief : पाठदुखी पाठ सोडत नाही; या गोष्टी फॉलो करा पाठदुखी होणारच नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com