Cleaning Tips : बाथरूमच्या भिंतींवर फंगस जमलंय? ट्राय करा या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cleaning Tips

Cleaning Tips : बाथरूमच्या भिंतींवर फंगस जमलंय? ट्राय करा या टिप्स

Bathroom Fungus Cleaning Hacks : घर जेव्हा एकदम स्वच्छ असते, तेव्हा राहायला आणि बघायलाही चांगलं वाटतं. घराचा कोपरा न् कोपरा लोक स्वच्छ ठेवतात. कारण घाणीने घरात अनेक आजार पसरतात.

हेही वाचा: Cleaning Tips : पाण्याची बाटली घाण झालीय; मग वापरा हा ऊपाय

घराची आपण चांगली करतो. पण तरीही बऱ्याचदा बाथरूममध्ये फंगस जमल्याचे आपल्याला बघायला मिळते. हे बघायला आणि आरोग्यासाठी चांगले नसते. याला कसं साफ करावं जाणून घेऊ

हेही वाचा: Cleaning Tips : 'या' टिप्सनं Washing Machine करा झटपट स्वच्छ

फंगस कधी होतं

उन्हाळ्यात हवेत आद्रचा कमी असते. पण हिवाळा आणि पावसाळ्यात हवेत आद्रता जास्त असते. बाथरूममध्ये पाण्याचा वापर अधिक असल्याने भिंती, दरवाज्यावर फंगस जमा होतं आणि त्याचे काळे डाग दिसू लागतात.

हेही वाचा: Cleaning Tips : गौरी-गणपतीला वापरलेली तांब्या पितळेची भांडी 'अशी' करा लख्ख!

व्हिनेगर शिंपडावे

जर तुमच्या बाथरूममध्ये फंगस लागले असेल तर त्या जागेवर स्प्रे बॉटलने व्हिनेगर शिंपडावे. २ ते ३ तास व्हिनेगर तसंच भिंतीवर राहू द्यावं. त्यातलं क्लिनिंग एजंट फंगस स्वतःच साफ करतात.

हेही वाचा: Fridge Cleaning Hacks: 'या' सोप्या टिप्स वापरून फ्रीजला आलेला पिवळेपणा दूर करा

ब्रशने फंगस साफ करावं

जिथे फंगस लागलं आहे त्या जागेला ब्रशने घासून साफ करावं. जर ब्रश नसेल तर कॉटनच्या कापडाने साफ करावे.

हेही वाचा: Amit Thackeray Cleans the Beach : काल विसर्जनानंतर आज समुद्रकिनारी साफसफाई मोहीम

बेकिंग सोड्याचा उपयोग

बाथरूमला फंगस लागल्यावर बाथरूम फार खराब दिसायला लागते. त्यामुळे या घाण फंगसला स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. ३ टी स्पून बेकिंग सोडा तर एक चमचा पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करावी. हे फंगस असलेल्या ठिकाणी लावावे.

बाथरूम नीट साफ करावे

फंगस काढल्यावर संपूर्ण बाथरूम नीट स्वच्छ करून घ्या. म्हणजे बाथरूममध्ये थोडेपण फंगस ऊरू नये.