
Facial Hairs Tips : चेहरा आणि अंगावर अनावश्यक केसांची समस्या बहुतेकांना असते. या Facial Hairs मुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे हे केस काढण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करतात. पण त्यामुळे थोड्या दिवसांसाठीच चेहरा क्लीन दिसतो. पण त्यानंतर येणाऱ्या छोट्या छोट्या केसांमुळे चेहरा अजूनच खराब दिसतो. जर तुम्हीही या कंटाळले असाल तर हा नॅचरल उपाय करून बघा.
अनावश्यक केस काढण्याच्या नॅचरल रेमेडिजचा विचार केला तर सगळ्यात पहिले बेसन आठवते. बेसन त्वचेला फक्त एक्सफोल्एट करत नाही तर सौंदर्यपण वाढवते. आतून स्वच्छ करते. जाणून घेऊ बेसनाचे उपाय
बेसन आणि दह्याचे मिश्रण
दही स्कीनसाठी फार उपयुक्त आहे. यात लॅक्टिक ॲसिड असते. जे त्वचेसाठी फायदेशीर असते. यात व्हिटॅमिन ए आणि इ असते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि रूक्षपणा कमी होतो.
गुलाबजल अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्सने भरलेले असते. ज्यामुळे चेहरा स्वच्छ आणि फ्रेश होतो. जर तुमची ड्राय स्कीन असेल तर हा पॅक तुम्हाला फारच उपयुक्त आहे.
कसे वापरावे?
एका बाऊलमध्ये ५ चमचे बेसनात २ चमचे दही टाका.
हे नीट मिक्स केल्यावर त्यात गुलाब जल टाका.
हा मास्क चेहऱ्याला आणि मानेला लावा.
थोड्यावेळ सुकू द्या
हलक्या हाताने रब करून मग गार पाण्याने धूवा. हा पॅक नियमितपणे वापरल्यावर फरक दिसतो.
बेसन आणि मध
जर चेहऱ्यावर जास्त केस असतील तर हा पॅक वापरा. यामुळे स्कीन टॅनिंग कमी होते. याचा पिंपल्स आणि डागांवरपण परिणाम होतो.
कसे वापरावे
एका बाऊलमध्ये ५ चमचे बेसन १ तिमूट हळद घालावी
त्यात अर्धा चमचा मध टाका. थोडेसे पाणी घालून नीट मिसळावे.
आवश्यक ठिकाणी लावून हलक्या हाताने चोळावे. सुकल्यावर कॉटन बॉल्सच्या मदतीने काढावे.
सरसोचे तेल आणि बेसन
शरीर आणि चेहऱ्यावरून अनावश्याक केस काढण्यासाठी सरसो (मोहरी)चे तेल उत्तम असते. साखर डेड स्कीन आणि अनावश्यक केस काढते.
कसे वापरावे
एका बाऊलमध्ये ४ चमचे बेसन आणि २ चमचा साखर मिक्स करा. त्यात २ चमचे सरसो तेल मिसळा.
स्क्रबिंग ग्रॅन्यूअल असल्याने साखर फार मिक्स करू नये.
हा पॅक चेहऱ्यावर लावून वरच्या दिशेने मालिश करा. फार चाळू नका.
१० मिनीटे ठेऊन मग गार पाण्याने धुवावे. आठवड्यातून २ वेळा लावा.
बेसन आणि मसूल डाळ
परदेशात हे उटणे बऱ्याच कालावधीपासून वापरले जाते.
यासाठी पहिले २ चमचे मसूर डाळ बारिक करून घ्यावी. त्यात २ चमचे बेसन घालावे.
यात १ चमचा लिंबाचा रस घालून पेस्ट बनवून घ्यावी. मिश्रण पातळ करू नये.
हे चेहऱ्यावर ३० मिनीट लाऊन ठेवावे. सुकल्यावर स्क्रब करावे.
आठवड्यातून २-३ वेळा करा.
तुम्हाला हवे तर यात दूध घालून घट्ट पेस्ट बनवून वापरू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.