डोळ्यांखाली Dark Circles दिसत आहेत, मग हे घरगुती उपाय नक्की करून पहा

ताण-तणाव, अपुरी झोप, जास्त स्क्रिन टाइम Screen Tims तसंच अयोग्य आहारामुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात. डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळं Dark Circles दूर करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात
हटवा डोळ्यांखालची काळी वर्तुळं
हटवा डोळ्यांखालची काळी वर्तुळंEsakal

सुंदर डोळ्यामुळे सौंदर्य अधिक खुलून दिसतं. मात्र जर डोळ्यांभोवती काळी वर्तुळ म्हणजेच डार्क सर्कल्स Dark Circles आले असतील तर त्यामुळे तुमचं सौदर्य फिकं फडतं. डार्क सर्कल्स होण्यासाठी विविध कारणं जबाबदार आहेत. Beauty Tips Marathi Remove Dark Circles under eyes with homemade packs

ताण-तणाव, अपुरी झोप, जास्त स्क्रिन टाइम Screen Time तसंच अयोग्य आहारामुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात. डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळं Dark Circles दूर करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात.

अनेकदा बाजारातील महागड्या क्रिम Cream किंवा मास्कचा वापर केला जातो. मात्र महागड्या आणि केमिकलयुक्त या प्रोडक्टमुळे डार्क सर्कल दूर होतीलच याची खात्री नसते. 

डोळे किंवा डोळ्याच्या आजुबाजुचा बाग हा अत्यंत नाजुक असल्याने केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर धोकादायकदेखील ठरू शकतो. अशा वेळी घरगुती काही उपायांनी तुम्ही डार्क सर्कल्स दूर करू शकता.

या घरगुती उपायांमुळे डोळ्यांना किंवा आजुबाजुच्या त्वचेला Skin इजा होण्याची शक्यता देखील अत्यंत कमी असते. असे काही अंडर आय मास्क आहेत जे तुम्ही घरीच सहज तयार करून डार्क सर्कलची समस्या दूर करू शकता. 

हे देखिल वाचा-

हटवा डोळ्यांखालची काळी वर्तुळं
केळीची साल मिळवून देते Dark Circles पासून सुटका

टोमॅटो आय मास्क

डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी म्हणजेच डोळ्या खालील काळ्या वर्तुळांना दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटो अंडरआय मास्कचा वापर करू शकता. या मास्क तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. टोमॅटोमध्ये ब्लिचिंग एजंट असल्याने डार्क सर्कल दूर होण्यास मदत होते. 

  • एका वाटीमध्ये अर्ध्या टोमॅटोचा रस आणि थोडा गर काढा. यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. दोन्ही रस एकत्र मिसळून तुमचा टोमॅटो अंडरआय मास्क तयार होईल. 

  • एका कापसाच्या बोळ्याच्या मदतीने हा रस डोळ्यांभोवती लावा.

  • हा मास्क १० मिनिटांसाठी वाळू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. 

  • दिवसातून दोन वेळा तुम्ही हा मास्क लावू शकता. 

टोमॅटोमधील ब्लिचंग एजंटमुळे रंग उजळण्यास मदत होते. तसचं यातील काही गुणधर्मांमुळे रक्त प्रवाह सुरळीत होतं. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होवू शकते. 

संत्र्याचा अंडरआय मास्क

संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी आढळतं त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी संत्र फायदेशीर ठरतं. यातील विटामिन सी तसचं इतर पोषक तत्वांमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. तसचं यातील विटामिन ए मुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

- संत्र्याचा मास्क तयार करण्यासाठी २ चमचे संत्र्याचा रसामध्ये १ चमचा ग्लिसरीन मिसळा.

- दोन कॉटन पॅड या मिश्रणात बुडवून ते डोळ्यांच्या खाली काही वेळासाठी ठेवा. 

- रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे डार्क सर्कल कमी होतील. नियमितपणे किमान आठवडाभर हा अंडरआय मास्क वापरल्यास डार्क सर्कल फिके झाल्याचं तुमच्या लक्षात येईल.  

हे देखिल वाचा-

हटवा डोळ्यांखालची काळी वर्तुळं
Dark Circles : डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी खा हे पदार्थ

बटाटा कोरफड आय मास्क

बटाटा आणि कोरफड या दोन्ही वस्तू अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या असून यापासून तुम्ही अगदी ५ मिनिटांमध्ये आय मास्क तयार करू शकता. या आय मास्कमुळे तुमचे डार्क सर्कल अगदी सहज दूर होतील. 

  • बटाटा कोरफड आय मास्क तयार करण्यासाठी एक बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर मिस्कमध्ये या बटाट्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 

  • या बटाट्याच्या पेस्टमध्ये समप्रमाणात कोरफडीचा गर बारीक करून किंवा तयार कोरफड जेल समप्रमाणात मिसळावं. 

  • दोन्ही मिश्रण चांगलं एकत्र करावं. तयार जेल तुम्ही ४-५ दिवस एखाद्या डबीमध्ये फ्रिजमध्ये ठेवू शकता. 

  • हे जेल बोटांवर घेऊन डोळ्याभोवती गोलाकार आकारात बोटांनी हलका मसाज करावा. 

  • १० मिनिटं बटाटा आणि एलोवेरा जेल डोळ्यांभोवती राहू द्या त्यानंतर चेहरा धुवा. 

  • बटाट्यामध्ये असलेल्या ऍझेलेइक अॅसिडमुळे डाग फिके होण्यास मदत होते. तसचं हायपरपिग्मेंटेशन हळूहळू कमी करण्यास मदत होते.

बटाटा आणि कोरफडीच्या या जेलचा नियमित वापर केल्यास डार्क सर्कलची समस्या तर दूर होईलच शिवाय डोळ्यां भोवती असणाऱ्या सुरकुत्या कमी होऊन डोळ्यांखाली येणारी सूज ओसरण्यासही मदत होईल. 

अशा प्रकारे घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही डार्क सर्कल्सची समस्या दूर करू शकता आणि चेहऱ्याचं सौंदर्य कायम राखू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com