Bhaubeej 2022: बहिणीला द्या 'या' खास भेट वस्तू, सणाचा अन् बहिणीचाही आनंद होईल द्विगुणीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaubeej 2022

Bhaubeej 2022: बहिणीला द्या 'या' खास भेट वस्तू, सणाचा अन् बहिणीचाही आनंद होईल द्विगुणीत

Bhaubeej Gifts: भारतात दिवाळी यंदा दणक्यात साजरी झाल्याचे दिसून येते. आता दिवाळीनंतर बहिण भावाचं नातं आणखी घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. तेव्हा तुमच्या बहिणीला खुश करण्यासाठी तुम्ही काही स्पेशल वस्तू द्या. त्याने तुमच्या बहिणीचा आनंद द्विगुणीत होईल.

या काही सुचवलेल्या वस्तू बघून तुमची बहिण नक्कीच खुश होईल

सौंदर्य प्रसाधने

सौंदर्य प्रसाधने महिलांना अत्यंत प्रिय असतात. त्वचेला उजळ करण्यासाठी किंवा अन्य उत्सव किंवा कार्यक्रमाप्रसंगी महिला आवर्जून मेकअप करतात. तुम्ही त्यांना मेकअप किट गिफ्ट करून आणखी त्यांच्या सौंदर्यप्रसाधनांत आणि आनंदातही भर पाडाल.

हॅंडबॅग

तुमची बहिण जॉब करत असेल किंवा शिकत असेल तर तिच्यासाठी ही भेटवस्तू उत्तम ठरेल. या हँडबॅगमध्ये ती तिच्या उपयोगात येणाऱ्या लहानसहान वस्तू ठेवू शकेल.

स्मार्टवॉच

अलीकडे सगळीकडे स्मार्टवॉचचा प्रचंड ट्रेंड दिसून येतो. एखाद्याच्या हातात दिसल्यास ती आपल्यालाही हवी हवीशी वाटते. तुम्हाच्या बहिणीकडे स्मार्टवॉच नसेल तर तुम्ही तिला स्मार्टवॉचही गिफ्ट करू शकता.

ज्वेलरी

महिलांना ज्वेलरीचं देखील प्रचंड वेड असतं. जर तुमच्या बहिणीला अमुक प्रकारचा सेट आवडतो हे तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही तो देखील तिला गिफ्ट करू शकता.

पादत्राणे (सँडल्स)

अनेकींना वेगवेगळ्या चपलांचं वेड असतं. तुमच्याही बहिणीला असेल तर चांगल्या कंपनीची एखादी टिकाऊ आणि फँसी सँडल तुम्ही गिफ्ट करू शकता.