Bike Tips: गाडीच्या मागे कुत्रे लागले तर करू नका ही चूक? महागात पडेल!

गाडी थांबवून कुत्र्यांना घालवण्याचा प्रयत्न करा
Bike Tips
Bike Tipsesakal

Bike Tips: भारतात मोठ्या संख्येने लोक दुचाकींचा वापर वैयक्तिक वाहन म्हणून करतात. अनेक शहरांमध्ये दुचाकी यांचाही व्यावसायिक वापर केला जात आहे. आता असे नाही की बाईक फक्त दिवसा वापरली जाते.

लोक रात्रीदेखील दुचाकीने प्रवास करतात. रात्री दुचाकीने प्रवास करताना लोकांना एक सामान्य समस्या भेडसावते, ती म्हणजे कुत्र्यांच्या मागे लागण्याची.

जर तुम्ही रात्री दुचाकीने प्रवास केला असेल तर तुम्हालाही या समस्येला सामोरे जावे लागले असेल. रात्री कुत्र्यांजवळून गाडी गेल्यावर अनेक कुत्रे भुंकतात आणि चालकाला चावायला धावतात. (Street Dogs)

Bike Tips
Dog Bite : निर्बीजीकरण बंद, महिनाभरात एक हजार श्‍वानदंश; लहान मुले, ज्येष्‍ठांमध्ये दहशत

अनेक लोक यावेळी घाबरतात आणि फास्ट गाडी पळवतात. अनेक लोक घाबरतात. पण, इथे घाबरून जाण्याची गरज नाही. तर थोडी हुशारी दाखवून आरामात कुत्र्यांपासून सुटका करू शकता.

रात्री अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांना कसे टाळावे?

खरे तर एखादे वाहन भरधाव वेगाने कुत्र्यांच्या जवळून जात असताना ते कुत्र्यांना ट्रिगर करते आणि ते भुंकण्यास सुरवात करतात. त्यामुळे आपल्या आपल्या अंगावर कुत्रे भुंकू नयेत असे वाटत असेल तर रात्रीच्यावेळी गाडी थोडी सावकाश चालवावी.

कुत्र्यांचा घोळका जवळपास असेल तर कमी वेगाने दुचाकी चालवावी लागते, हे लक्षात ठेवावे लागेल. दुचाकीचा वेग कमी करा आणि सावधगिरीने जा. असे केल्यास कुत्रे चावायला येणार नाहीत. (Bike Tips)

Bike Tips
Rabbit-Dog Video : संकटांशी दोन हात करायला शिका! मृत्यूच्या दाढेतही असा केला सश्याने सामना

मात्र कुत्रा भुंकला किंवा चावायला धावला तरी घाबरू नका किंवा दुचाकीचा वेग वाढवू नका कारण असे केल्याने अपघात होऊ शकतो. अशा वेळी मोटारसायकल बंद करा आणि एकाजागी थांबवा.

गाडी थांबवून कुत्र्यांना घालवण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या ठिकाणी असेल तर इतर लोकांची मदत तुम्ही घेऊ शकता.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com