Brown Sugar Benefits : तुम्ही एक महिना ब्राऊन शुगर खाल्लीत तर काय होईल?

पांढऱ्या साखरेऐवजी आम्ही ब्राऊन शुगर का वापरावी?
Brown Sugar Benefits
Brown Sugar Benefits esakal

Brown Sugar Benefits :

आजकाल प्रत्येकाच्या घरात पांढरी साखर वापरली जाते. पांढऱ्या सारखेला पर्याय म्हणून बऱ्याच गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. पण, साखरेची मजा कशातच येत नाही. अशा लोकांसाठी ब्राऊन शुगर हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

पांढऱ्या साखरेचा वापर सामान्यतः सर्व घरांमध्ये केला जातो, परंतु जर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल आणि तुमच्या आरोग्याबाबत जागरूक असाल तर तुम्ही फक्त ब्राऊन शुगरच वापरावी. पांढऱ्या साखरेऐवजी आम्ही ब्राऊन शुगर का वापरावी, त्याचे काय फायदे आहेत, याबद्दल आज जाणून घेऊयात. (Brown Sugar Health Benefits)

Brown Sugar Benefits
Bhima Sugar Factory : 'भीमा' देणार 2 हजार 400 रुपये पहिली उचल

ब्राऊन शुगर कशापासून बनते

ब्राऊन शुगर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मोलॅसेस, हा एक द्रव आहे जो ऊस किंवा साखर बीट शुद्ध करताना तयार होतो. या प्रक्रियेत साखर वेगळी होते आणि मोलॅसिस वेगळे होते. पांढऱ्या साखरेत मोलॅसिस घातल्यास ते तपकिरी होते आणि त्याचे पौष्टिक मूल्यही वाढते. घरच्या घरी ब्राऊन शुगर कशी बनवायची याचे अनेक व्हिडीओ तुम्हाला इंटरनेटवर सा

मोलॅसेस या द्रव पदार्थापासून ब्राऊन शुगर बनवली जाते
मोलॅसेस या द्रव पदार्थापासून ब्राऊन शुगर बनवली जातेesakal

ब्राऊन शुगर तुमच्या आरोग्यासाठी का फायदेशीर आहे ?

एनर्जी टिकवून ठेवते

शरीरातील ऊर्जेची कमतरता ब्राऊन शुगरच्या सेवनाने भरून काढता येते. ब्राऊन साखर देखील पांढऱ्या साखरेप्रमाणे एनर्जीने भरलेली आहे. 100 ग्रॅम ब्राऊन शुगरमध्ये 380 KCL एनर्जी असते. एखादी व्‍यक्‍ती जे काही खाते, मानवी शरीर त्या कॅलरीजचे ऊर्जेमध्‍ये रूपांतर करते.

शरीराला जेवढे आवश्यक असते तेवढेच शरीर वापरते. उर्वरित कॅलरीज चरबी म्हणून साठवते. अशा स्थितीत शरीराला आवश्यक तेवढीच कॅलरीज शरीराला ऊर्जा देऊ शकतात.

पीरियड क्रॅम्प्स कमी करते

NCBI (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) च्या वेबसाइटवर पब्लिश झालेल्या संशोधनानुसार, पारंपारिक औषध पद्धती मासिक पाळीच्या क्रॅम्पपासून मुक्त होण्यासाठी किंवा आराम मिळविण्यासाठी ब्राऊन साखर असलेल्या चहासह इतर घरगुती पदार्थांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

ब्राऊन शुगरमध्ये पोटॅशियम असते. संशोधनानुसार पोटॅशियममुळे मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

Brown Sugar Benefits
Solapur Sugar Factory : साखर उद्योगाच्या मदतीला पवार की फडणवीस?

थंडीपासूनही आराम मिळतो

हिवाळ्यात ब्राऊन शुगरचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. संशोधनानुसार ब्राऊन शुगरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. म्हणूनच आयुर्वेदासारख्या भारतीय वैद्यकीय शास्त्रात ब्राऊन शुगरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचा सकारात्मक परिणाम सर्दी आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांवर दिसून येतो.

पोटासाठी फायदेशीर

ब्राऊन शुगरचे फायदे पचनसंस्थेशी संबंधित समस्यांमध्ये दिसून येतात. ब्राऊन शुगरमध्ये काही प्रमाणात व्हिटॅमिन बी असते. संशोधनानुसार, इरिटेबल बोवेल सिंड्रोम असलेल्या रूग्णांना इतर पोषक तत्वांसह जीवनसत्त्वे B1, B2 आणि B6 देण्यात आले, त्यानंतर त्यांना पोटदुखी, पोट फुगणे आणि आतड्याची हालचाल यांसारख्या IBS लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली.

Brown Sugar Benefits
Chopda Sugar Factory: चोपडा साखर कारखान्याच्या सभेत वादळी चर्चा; ‘अजेंड्या’वरील 9 पैकी 3 विषय नामंजूर

चमकदार त्वचा मिळवा

ब्राऊन साखर देखील त्वचेच्या समस्यांपासून आराम देण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, साखरेला नैसर्गिक स्क्रबच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, स्क्रब केल्याने त्वचेच्या मृत पेशी आणि घाण देखील दूर होऊ शकतात. शिवाय, ते त्वचा निरोगी देखील बनवू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या होम स्क्रबमध्ये ब्राऊन शुगर वापरू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com