Car Care कारमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान ठेवताय? इंजिनसह या पार्ट्सचं होईल नुकसान

Car Care - कोणत्याही कारमध्ये उपलब्ध सीटहून अधिक लोकांनी प्रवास करणं किंवा बूटस्पेसमध्ये उपलब्ध असलेल्या जागेत अवजड किंवा क्षमतेहून अधिक सामान ठेवणं तुम्हाला महागात पडू शकतं
Car Care - नका करु कार ओव्हरलोड
Car Care - नका करु कार ओव्हरलोडEsakal

कारमधून प्रवास करणं म्हणजे आरामदायी प्रवास करणं. कार प्रवासामध्ये Car Travel तुम्हाला उन्हाची, पावसाची एवढंच नव्हे तर तुमचं सामान किंवा बॅग्सचं ओझं बाळगण्याची चिंता नसते. मात्र अनेकदा काहीजण कारमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान ठेवतात. Car Care Tips in Marathi How much load car should take

एवढचं नव्हे तर कारच्या क्षमतेहून Car Capacity अधिक लोक कारमध्ये बसून प्रवास करतात. कारही आपल्या सोयीसाठी असली तरी अर्थात प्रत्येक कारची वजन वाहण्याची वेगवेगळी क्षमता असते. या क्षमतेहून अधिक वजन किंवा भार कारवर झाल्यास कारच्या इंजिनसह Car Engine कारच्या इतर पार्ट्सवर त्याचा परिणाम होवू शकतो.

कोणत्याही कारमध्ये उपलब्ध सीटहून अधिक लोकांनी प्रवास करणं किंवा बूटस्पेसमध्ये उपलब्ध असलेल्या जागेत अवजड किंवा क्षमतेहून अधिक सामान ठेवणं तुम्हाला महागात पडू शकतं. यामुळे कारच्या कोणच्या भागाचं नुकसान होऊ शकतं हे जाणून घेऊ यात.

इंजिनवर होतो दुष्परिणाम

कारचा सर्वात महत्वाचा भाग किंवा पार्टमध्ये कारचं इंजिन. जर तुम्ही कारमध्ये जास्त माणसांमुळे किंवा सामानामुळे ओव्हरलोडिंग करत असाल तर कारच्या इंजिनवर प्रेशर येऊ शकतं. यामुळे कारच्या इंजिनच्या महत्वाच्या पार्टमध्ये किंवा संपूर्ण इंजिनमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. यामुळे ड्रायव्हिंग करताना कार कधीही बंद पडू शकते.

सस्पेंशन आणि टायरवर परिणाम

जर तुम्ही कारमध्ये सतत ओव्हरलोडिंग करत असाल तर त्याचा परिणाम सस्पेंशनवर होवू शकतो. खास करून कार ओव्हरलोडिंग करून खराब किंवा खड्डे असलेल्या रस्त्यावर चालवल्याने सस्पेंशनवर परिणाम होवून प्रवाशांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.

तसंच सतत ओव्हरलोडिंग केल्याने कारचे टायर देखील घासले जाऊन टायर्सची लाइफ लवकर कमी होते.

हे देखिल वाचा -

Car Care - नका करु कार ओव्हरलोड
Car Engine च्या या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष, अचानक बंद पडेल कार

कारचं अलायनमेंट होईल खराब

कारमध्ये क्षमतेहून जास्त सामान ठेवल्यास अलायनमेंट बिघडण्याची शक्यता वाढते. कार अलायनमेंट बिघडल्यास सेंटर आउट होण्याची शक्यता असते. ज्याच्या दुरुस्तीसाठी तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.

मायलेज होवू शकतं कमी

कारमध्ये ओव्हरलोडिंग केल्याने कारचं मायलेज Car Milage कमी होऊ शकतं. खास करून पेट्रोल इंजिन असलेल्या कारमध्ये सतत ओव्हरलोडिंग केल्याने हळू हळू कारचं मायलेज कमी होवू लागतं.

अॅक्सिलरेशन आणि ब्रेकिंग सिस्टमवर परिणाम

कारमध्ये क्षमतेहून अधिक प्रवासी बसल्यास किंवा बूट स्पेसमध्ये जास्त सामान ठेवल्यास चालकाला ब्रेक लावण्यास अडचण निर्माण होवू शकते. जुन्या कारमध्ये तर ब्रेक लावण्यास अधिक ताकद लावावी लागू शकते. ओव्हरलोडिंगमुळे कारच्या ब्रेकिंग सिस्टिमवर परिणाम होवू शकतो. तसंच कारचा पिकअपही कमी होतो.

कारच्या महत्वाच्या पार्टवर परिणाम होवू नये आणि सुरक्षेच्या दृष्टीने देखील कारमध्ये कायम कंपनीकडूवन ठरवून दिलेल्या क्षमतेएवढचं सामान किंवा प्रवासी असतील याची काळजी घेणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

Car Care - नका करु कार ओव्हरलोड
Car Care Tips : गाडीतील Engine Oil बदलणं का आहे गरजेचं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com