Carrot Peel : गाजराची साल फेकून देऊ नका, तिचे आहेत अनेक फायदे,असा करा वापर

सॅलड किंवा इतर पदार्थ सजवण्यासाठी गाजराची साल वापरा
Carrot Peel
Carrot Peelesakal

Carrot Peel :

आजकाल बाजारात गाजर अतिशय स्वस्त दरात मिळतात. हिवाळ्यात, लोक स्वस्त आणि ताज्या गाजरांपासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवतात. त्यापैकी काहीतरी खास आपल्या सर्वांच्या घरात नक्कीच बनते. हलवा, लोणचे आणि कोशिंबीर यासह अनेक पदार्थ आणि पेये या गाजरापासून बनविली जातात.

लोकांना गाजराची भाजीही खूप आवडते. पण गाजर कापण्यापूर्वी लोक त्याची साल काढून फेकून देतात. तुम्हीही गाजर सोलून फेकून देता का? आम्ही तुम्हाला सांगतो की, गाजराची साल फेकून देण्याऐवजी त्यांचा अनेक मार्गांनी पुन्हा वापर केला जाऊ शकतो.

गाजराच्या सालीचे अनेक पदार्थ आहेत. जे सहज बनवता येऊ शकतात. जे चविष्ट तर लागतातच पण त्यासोबत पौष्टीकही होतात.

Carrot Peel
Pickle Recipes : हिवाळ्यात खा गाजर-मुळ्याचं चटपटीत लोणचं! जाणून घ्या सोपी रेसिपी

चिप्स बनवा

गाजर सोलल्यानंतर साल फेकून देण्याऐवजी, स्वच्छ पाण्याने धुवा, कपड्याने पुसून टाका आणि कोरडे राहू द्या. चाकूच्या साहाय्याने गाजराच्या सालीचे २-२ इंच तुकडे करा, तेल लावा, मीठ, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो शिंपडा आणि एअर फ्रायरमध्ये तळून घ्या. चविष्ट कुरकुरीत चिप्स सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.

Carrot Peel
Black Carrot Benefits : हिवाळ्यात नक्की खा काळे गाजर; वेट लॉससोबत या गंभीर आजाराचा धोका करतात कमी

सूप बनवा

सूप बनवण्यासाठी तुम्ही गाजराची साल देखील वापरू शकता. सूप बनवण्यापूर्वी गाजर स्वच्छ पाण्याने धुवून कापून घ्या. सालीमध्ये पाणी आणि मीठ घालून कुकरमध्ये उकळवा. आता एका कढईत काढून चांगले शिजवून घ्या. चवीनुसार मिरपूड आणि साखर घाला आणि गरम सर्व्ह करा. हवे असेल तर त्यात तूम्ही कॉर्न पीठ सुद्धा घालू शकता. ज्यामुळे या सूपला दाटसरपणा येईल.

गार्निश करण्यासाठी वापरा

सॅलड किंवा इतर पदार्थ सजवण्यासाठी गाजराची साल वापरा. साल धुवून बारीक चिरून घ्या आणि नंतर सॅलड वर पसरवा. ज्यामुळे मुलंही कलरफुल सॅलड पाहून खूश होतील.

Carrot Peel
Black Carrot Benefits : हिवाळ्यात नक्की खा काळे गाजर; वेट लॉससोबत या गंभीर आजाराचा धोका करतात कमी

दुध गाजराचा करा प्रयोग

गाजराची साल धुवून बारीक चिरून घ्या. कापल्यानंतर, दोन ग्लास दुधात उकळण्यासाठी सोडा. दूध आणि गाजराची साले उकळून घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड टाका आणि थोडा वेळ शिजवा. सर्व काही चांगले शिजले की नीट मिक्स करून सर्व्ह करा.

Carrot Peel
सामान्यांना दिलासा देणारा, विकसित भारताचे गाजर दाखविणारा अर्थसंकल्प

मिठाई बनवा

गाजराच्या सालीपासून मुलांसाठी कँडीज बनवता येतात. गाजराची साल नीट धुवा, वाळवा आणि एका पॅनमध्ये साखरेचा पाक तयार करा. गाजराची साल जाडसर पाकात बुडवून प्लेटमध्ये ठेवा, बेक करा आणि मुलांना सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com