हातात पैसा टिकत नाही? फॉलो करा या टिप्स |Best Way to Save Money | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Way to Save Money

हातात पैसा टिकत नाही? फॉलो करा या टिप्स

माझ्या हातात पैसा टिकत नाही, असे अनेकजण म्हणतात. अनेकजण खर्च करताना विचार करत नाही आणि मग पैसा अपूरा पडतो, अशी तक्रार करतात. बरेचदा अनावश्यक खर्च करण्यानेही योग्य बचत होत नाही. मात्र पैशांची बचत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. (Best Way to Save Money)

अनेकदा पैशांची बचत करुनही आपल्या लहान-मोठ्या चुकांमुळे फायदा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यांद्वारे तुम्ही पैशांची योग्य बचत करू शकता. (check here the list of best way to save money)

हेही वाचा: तुम्ही फोन कसा पकडता? यावरून कळतं व्यक्तिमत्त्व; कसं? जाणून घ्या..

१. अनावश्यक खरेदी करु नका

बरेचदा आपण अनावश्यक खरेदी करतो. शक्य झाल्यास अनावश्यक खरेदी टाळा. यामुळे तुमचा वेळ आणि तुमच्या पैशांचीसुद्धा बचत होणार.

२. ऑफर्स असतानाच शॉपिंग करा

अनेकदा ऑनलाईन शॉपिंग करताना ऑफर्स सुरु असतात. अशा ऑफर्समध्ये खरेदी करा. ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होणार.

हेही वाचा: Weight Loss Tips: लग्नाआधी वजन कमी करायचंय? फॉलो करा खास टिप्स

३. बजेट तयार करा

पैशांची बचत करण्याचा एकमेव मार्ग बजेट (Budget) तयार करणे होय. कुठे किती पैसे खर्च करायचे आणि कुठे किती बचत करायची आहे ही गोष्ट ठरवणं बजेटमुळं सोपं होतं.

४. पैशांच्या व्यवहारामध्ये पार्टनरला सहभागी करा

पैशांशी संबंधित बाबींमध्ये पार्टनरलाही (Partner) सहभागी करून घेतलं तर बचत आणखी होते. कुठे किती पैसे खर्च करायचे आहेत याच्या नियोजनामध्ये पार्टनरची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. पार्टनरनी दिलेला सल्ला सुद्धा बचत करण्यात आणखी मदत करणार

हेही वाचा: जुना स्मार्टफोन विकून मिळवा चांगली किंमत, फॉलो करा या सोप्या ट्रिक्स

५. इन्कमनुसार खर्च ठरवा

आपण जर आपल्या इन्कमनुसार पैशांची बचत केली तर पैशाचं योग्य मॅनेजमेंट होणार. खरं तर आपण आपल्या कमाईनुसार खर्च केला पाहिजे.

५. खर्च करण्यापूर्वी करा बचतीचा विचार

खर्च करण्यापूर्वी बचतीचा विचार करणे गरजेचे आहे. ठरावीक रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवणं महत्त्वाचं आहे. बचतीची रक्कमसेट न करता खर्च करत राहिल्यास बचतीचं गणित बिघडेल

Web Title: Check Here The List Of Best Way To Save Money

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top