
तुम्ही फोन कसा पकडता? यावरून कळतं व्यक्तिमत्त्व; कसं? जाणून घ्या..
जगात कुणीच कुणासारखं नसतं.प्रत्येकाचं व्यक्तीमत्व हे वेगवेगळं असू शकतं.आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ही आपल्या वागण्या बोलण्यातून दिसून येते.आपण कसं बोलतोय, आपण कसं वागतोय, यातून बऱ्याचदा आपले व्यक्तिमत्व ठरत असते.अशातच एका व्हायरल पर्सनॅलिटी टेस्टनुसार, तुम्ही तुमचा फोन कसा धरता,यावरुन तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेता येते.
हेही वाचा: Photo Story: ऑफिसमध्ये उत्साही कसं राहायचं? जाणून घ्या 5 सोप्या टिप्स
१. तुमचा फोन धरण्याचा सर्वात सोपी मार्ग म्हणजे एकाच हाताने तुमच्या अंगठ्याचा वापर करत फोन वापरणे. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही निश्चिंत,आनंदी आणि स्वत:बद्दल विश्वास बाळगणारे व्यक्ती आहात. आयुष्यात तुमच्यावर जे पण संकट येतात, ती स्वीकारण्याची तुमच्याकडे धैर्य असते. तुमच्या क्षमतेबद्दल आत्मविश्वास बाळगून तुम्ही तुमच्या मार्गातील कोणतीही नवीन संधीचे सोने करता.
हेही वाचा: मुलांच्या भावनिक विकासासाठी तुम्ही काय करता ? बुद्ध्यांकापेक्षा महत्त्वाचा आहे भावनांक
२. जर तुम्ही तुमचा फोन एका हाताच्या अंगठ्याने स्क्रीनवर स्क्रोल करता आणि दुसऱ्या हाताने फोन धरता तर तुम्ही तत्त्वे किंवा आदर्श यांना अनुसरण्यापेक्षा व्यावहारिक रीतीने प्रश्न हाताळणारे, योग्य जाणीवपुर्वक निर्णय घेणारे व्यक्ती आहात. याप्रकारे तुम्ही फोन धरता त्यावरुन कळते की तुम्ही कोणत्याही गोष्टीचा चान्स न घेता काळजीपूर्वक विचार करता आणि निर्णय घेता
हेही वाचा: चकित करणारं रहस्यनाट्य
३. तुम्ही तुमचा फोन तुमच्या दोन्ही अंगठ्याने स्क्रीनवर स्क्रोल करत असाल तर तुम्ही तुमच्या वाटेत येणाऱ्या आव्हानांवर लवकरात लवकर उपाय शोधण्यास तत्पर असतात.‘सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट’याच्याशी तुमचं उत्तम जुळतं. सोबतच यावरुन तुम्ही पार्टी आणि सण-उत्सव साजरे करण्यात खुप उत्साही असता, असेही दिसते.
हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2022
४. जर तुम्ही तुमच्या तर्जनी बोटाने मोबाईलची स्क्रीन स्क्रोल करत असाल तर तुम्ही खुप कल्पनाशक्तीने वाढलेले व्यक्ती आहात. तुम्ही सतत नवीन गोष्ट शोधण्याच्या प्रयत्नात असता.तुम्हाला कितीही क्लिष्ट समस्या असली तरी तुम्ही त्यावर मात करता. तुम्ही नाते मैत्री-प्रेमसंबधात लाजाळू आहात
Web Title: Our Personality Decides How We Hold Our Phone According To Personality Test
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..