esakal | लहानपणी बहिण-भावंडाची वाईट वर्तणूक मुलांना बनवू शकते मानसिक रुग्ण | Parenting
sakal

बोलून बातमी शोधा

लहानपणी बहिण-भावंडाची वाईट वर्तणूक मुलांना बनवू शकते मानसिक रुग्ण

लहानपणी बहिण-भावंडाची वाईट वर्तणूक मुलांना बनवू शकते मानसिक रुग्ण

sakal_logo
By
शरयू काकडे

लहाणपणी बहिण किंवा भावाची वाईट वर्तणूक सहन करणारे मुलं मोठे होऊन मानसिक रुग्ण होऊ शकतात. अलिकडे झालेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. संशोधनानुसार, लहानपणी ज्या मुलांना त्यांचे भाऊ-बहीण त्रास देत होते नंतरच्या आयुष्यात त्यांच्यामध्ये मानिसक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. University of York च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार ब्रिटनमध्ये ११ ते१७ वर्षांपर्यंत जवळपास १७०० युवकांच्या माहितीवर विश्लेषण केले होते.

हेही वाचा: Health Tips : घरगुती उपाय करा, अ‍ॅसिडीटी पळवा!

किशोरवयीन काळात भेडसावतात मानसिक समस्या

दादागिरी किंवा गुंडगिरी Bullying करणे म्हणजे, भावनात्मक आणि शारीरिकदृष्ट्या दुखाविण्याच्या उद्देश्शाने त्रास देणे. म्हणजेच जेव्हा बहिण-भावडांचे भांडण करतात, नावाची मोडतोड करून हाक मारतात, त्रास देणे...इ. संशोधनातून असे सांगण्यात आले आहे की, ११ ते १४ वर्षांमधील जी मुलं दादागिरी सहन करतात त्यांवा १७ व्या वयापर्यंत वयापर्यंत मानसिक आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता जास्त होती. संशोधनातील माहितीनुसार, ज्या मुलांचे आपल्या बहिण-भावंडासोबत चांगले संबध होते त्यांच्यासोबत तुलना केल्यानंतर ज्या मुलांवर बहिण-भावंड दादागिरी करतात ते अंतर्मुखी (Introvertated)असतात.

हेही वाचा: मित्र- मैत्रिणींसोबत भांडण झालंय, गैरसमज कसा दुर कराल?

आधी झालेल्या संशोधननुसार, बहिण-भावांच्या वाईट वर्तणूकीमुळे शाळांमध्ये तात्काळ मानिसक आरोग्यासंबधीच्या अडचणी आणि समस्या निर्माण होतात. ब्रिटन आणि अमेरिकामध्ये प्रत्येक ५ वर्षांना एका मुलाला बहिण भावंड किंवा शाळेतील मुलांकडू ,स्कुल ॲक्टिव्हिटी शिबिरांमध्ये त्रास दिला जातो. या संशोधनामध्ये ज्यांना आणखी एक बहिण-भाऊ आहे अशा १७१५७ मुलांसोबत समावेश केला होता.

हेही वाचा: फाटकी जीन्स वापरून रहा स्टाईलिश

वयोगटानुसार बदलली मुलांची उत्तर

संशोधनामध्ये सहभागी झालेली मुले आणि मुलींची संख्य समान होती. संशोधनादरम्यान, घरामध्ये मुलांवर दादागिरी होते का असा प्रश्न पालकांना विशेषत: मुलांच्या आईला विचारण्यात आला. सहभागी मुल जेव्हा १७ वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यासोबत आई-वडिलांबाबतही प्रश्न विचारले. संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मुले ११ ते १४ वर्षाचे असतात तेव्हा त्यांची आईवडिलांसोबत उत्तर जवळपास सारखी होती पण जेव्ही ही मुले १७ वर्षांची झाली तेव्हा त्यांची उत्तर त्याच्या पालकांपेक्षा वेगळी होती.

हेही वाचा: चित्रपटात शारीरिक संबंधांची सुरुवात 'किसींग'ने का होते?

दादागिरीची चार गटात विभागणी

दादागिरीची चार गटात विभागणी करण्यात आली होती ज्यामध्ये पहिल्या गटात बहिण-भावंडाद्वारे त्राल सहन केलेले, दुसऱ्या गटात ज्यांना आपल्या बहिण-भावांना त्रास दिला आहे अशा मुलांचा समावेश केला होता. तिसऱ्या गटामध्ये ज्या मुलांनी आपल्या बहिण भावडांना त्रास दिला आहे आणि त्रास सहनही केला आहे आणि चौथ्या गटामध्ये ज्यांनी आपल्या बहिण-भावंडाना त्रास दिला नाही. मुलांमधील उत्साहाची पातळी ठरविण्यासाठी मुलांना त्यांचे मानसिक आरोग्य आणि आत्मसन्मानला रँकिंग देण्यास सांगितले होते.

हेही वाचा: कोकेन, चरस अन् मेफेड्रोन... मोठ्या सेलेब्रेटिंचा 'दम मारो दम'

अध्ययनमध्ये समाविष्ट एकूण मुलांपैकी अर्ध्या मुलांना ११ व्या वयामध्ये त्यांच्या बहिण-भावडांनी त्रास दिला होता. त्याचबरोबर, या मुलांनी आपल्या बहिण-भावंडाना त्रास देखील दिला होता. किंबहूना १४ वर्षांच्या वयात यामध्ये एक तृतियांश घट झाली. संशोधनाच्या निष्कर्षांनुसार त्रास सहन करणारे मुलांमध्ये मानसिक समस्यांची उद्वभवण्याचा धोका अधिक होता. त्यांच्यामध्ये मानसशास्त्रीय स्वरूप चिंतित होणे आणि स्वत:ला नुकसान पोहचविण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा: ग्लॉसी नेल पॉलिशला द्या मॅट लूक; जाणून घ्या सोप्या टिप्स

loading image
go to top