Diwali 2022 : फॅशनेबल फ्रिल वर्क ब्लाऊजने दिवाळीत दिसा उठून

सध्या फ्रिल वर्क ब्लाऊजचा ट्रेंड
Diwali 2022 fashion
Diwali 2022 fashionesakal

पुणे : आजकालच्या महिलांना फॅशन ट्रेंड चांगलाच समजतो. त्यांना न्यु ट्रेंडची संपूर्ण माहिती असते. त्यामुळे कोणत्या कार्यक्रमात कोणती स्टाइल करायची हे फॅशन ट्रेंड काय आहे हे पाहून ठरवले जाते. दिवाळीत साडी कॉमन असली तरी फ्रिल वर्कचा ट्रेंड आला आहे.

Diwali 2022 fashion
Diwali 2022 : या पद्धतीने करा खमंग खुसखूशीत चकली; पहा रेसिपी

आधी फ्रिलची साडी बाजारात आली आणि मग त्यावर फ्रीलचे ब्लाऊज घालण्याची स्टाइल आली. काठपदर असो वा पार्टीवेअर साडी अशा कोणत्याही साडीवर मॅच होईल असेच याचे डिझाईन आहे. आज काही वेगळे ब्लाउज डिझाईन्स पाहुयात. या डिझाईन्सने तूमचे ब्लाऊज आणि तूम्ही दोघेही खुलून दिसाल.जर तुम्हाला काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर तुम्ही ही डिझाइन करू शकता. अशा ब्लाउजला तुम्ही इंडो-वेस्टर्न लुकमध्ये स्टाइल करू शकता.

Diwali 2022 fashion
Diwali 2022 : या दिशेपासून सुरु करा दिवाळीची साफ-सफाई; लक्ष्मी-कुबेराचा लाभेल आशिर्वाद

जर तुम्हाला स्लीव्हज आणि नेक लाईनची रेग्युलर स्टाइल नको असेल तर त्याजागी तूम्ही फ्रिल्स वापरू शकता. तसेच, ब्लाउजच्या खाली नेटची लेस वापरता येईल.सध्या साडीमध्ये नेटची साडी तरूणींच्या पसंतीस उतरते आहे. त्यावर अशाप्रकारचे नेटचेच फ्रिल वर्कचे ब्लाउज तूम्हाला क्लासी लुक देईल.तूम्हाला शोल्डरला फ्रील वर्क नको असेल तर तूमच्यासाठी हे डिझाईन परफेक्ट आहे. लेअर असलेले फ्रील डार्क कलर ब्लाउजला अजून स्टायलीश बनवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com