Family Tips : सासू-सुनेच्या वादात तुमचं सँडविच होतंय? फॉलो करा 'या' टिप्स

बहुतेक लोकांचा प्रश्न असतो की जर पत्नी आणि आईमध्ये भांडण किंवा वाद झाला तर त्याने काय करावे?
Family Tips
Family Tipsesakal
Updated on

Balance Between Mother And Wife : लहानपणापासून लग्नापर्यंत आई आपल्या मुलाची काळजी घेते आणि प्रत्येक सुख पूर्ण करते. मात्र, लग्नानंतर तोच मुलगा नवरा झाल्यावर बायको आणि आईमधील बॅलन्स कसा सांभाळायचा, या संभ्रमात पडतो. कारण अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते की दोघांचेही ऐकावे लागते.

Family Tips
Family Tips : आनंदी कौटुंबिक जीवनासाठी हे उपाय नक्की करा

लग्नानंतर पुरुषाला पती म्हणून पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते, तर मुलगा म्हणून तो आईच्या गरजा आणि आनंदासाठी काहीही करायला तयार असतो. बहुतेक लोकांचा प्रश्न असतो की बायको आणि आईमध्ये भांडण किंवा वाद झाले तर त्याने काय करावे?

Family Tips
Family planning : नवविवाहित जोडप्यांना मिळणार कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या

बायको आणि आईमध्ये वाद झाला तर काय करायचं?

या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाकडे नसले तरी आम्ही एका व्हिडिओद्वारे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी समस्या समजून घेतली आणि हसत हसत अप्रतिम उत्तर दिले. सत्संगाच्या वेळी एका व्यक्तीने त्यांना याबाबत विचारले. तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले. पण हा योग्य प्रश्न होता, कारण अशा परिस्थितीत काय करावे हे कोणालाच समजत नाही.

Family Tips
केवढं मोठ्ठ कुटुंब! Family Tree मध्ये २ कोटी ७० लाख नातेवाईक, रिसर्चमध्ये दावा

श्री श्री रविशंकर यांनी हे उत्तर दिले

या प्रश्नाचे उत्तर श्री श्री रविशंकर यांनी अतिशय नम्रपणे दिले. ते म्हणाले, 'आई आणि पत्नीमध्ये समतोल निर्माण करायचा असेल, तर दोघांमध्ये उभे राहण्यास कधीही विसरु नका. त्यांना त्यांचे भांडण स्वतः करु द्या. त्यामध्ये पडू नका.

जे काही घडत आहे ते शांतपणे पाहा, कारण जर तुम्ही कोणा एकाची बाजू घेतली तर तुम्ही नक्कीच संकटात पडाल. शिवाय, तुम्ही कोणाचीही बाजू घेतली नाही तरी तुम्ही अडचणीत येण्यास भाग पडता. मला विश्वास आहे की ते हाताळण्याचे कौशल्य तुमच्याकडे असले पाहिजे. तुम्ही हे कौशल्य मिळावे म्हणून देवाला प्रार्थना करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com