

How 5 Extra Minutes of Sleep & 2 Minutes Walking Can Extend Life
Sakal
Simple healthy habits to extend life: बदलती जीवनशैली, बदलतं वातावरण, भेसळयुक्त अन्नपदार्थ, राहणीमान, असंतुलित आहार यामुळे आजच्या घडीला आयुषमान कमी कमी होत चाललं आहे. पण दररोजच्या सवयींमध्ये काही अगदी छोटासे बदल केले तर दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य मिळू शकतं, असा महत्त्वाचा निष्कर्ष एका नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आला आहे. फक्त पाच मिनिटं अधिक झोप घेणं आणि दोन मिनिटं जलद चालणं किंवा जिने चढणं यामुळे आयुष्य सरासरी एक वर्षाने वाढू शकतं, असं या अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं आहे.