Gym Playlist : आपल्या बोरिंग एक्सरसाईज सेशनला बनवा एनर्जेटिक या सुपर्ब बॉलीवूड गाण्यांनी

मूड कोणताही असो त्याला छान बनवण्याच काम गाणी नेहमीच करतात
Gym Playlist
Gym Playlistesakal

Gym Playlist : मूड कोणताही असो त्याला छान बनवण्याच काम गाणी नेहमीच करतात, बहुदा संगीताचीच ही जादू आहे. अनेकजण उदास वाटत असेल तर तेव्हा आपला मूड फ्रेश करण्यासाठी गाणी ऐकतात आणि त्यांचा मूड रीफ्रेश करतात. अनेक जणांना अभ्यास करतांनाही गाणी ऐकण्याची आवड असते. काहीजण रात्री झोपतांनाही गाणी ऐकतात. एकंदरीत गाणी आपला मूड छान करतात. जिममध्ये सुद्धा गाणी आपल्याला खूप मदत करतात.

Gym Playlist
Kamshet Trip : आपल्या पार्टनर सोबत पॅराग्लायडिंगची मजा घ्या तीही पुण्यापासून अगदीच जवळ

स्टॅमिना वाढतो

अनेक ट्रेनर म्हणतात की, म्युझिक ऐकल्याने लोकांचा मूड एनर्जेटिक होतो. काही सायकोजिकल स्टडीज नुसार जिममध्ये एक्सरसाईज करतांना गाणी ऐकल्याने वर्कआऊट स्टॅमिना वाढतो.

एकाग्रता वाढते

अनेकांना वर्कआऊट करतांना शांतता हवी असते, आता जिममध्ये हे जरा कठीण आहे. आपल्या कानात गाणी वाजवत असल्याने आजूबाजूचे आवाज आपल्याला डिस्टर्ब करत नाही. त्यामुळे आपलं चित्त विचलित होत नाही.

Gym Playlist
Travel In Pune : पुण्यातल्या पुण्यातच विकेंड प्लॅन करायचा आहे? मग पू.ल देशपांडे उद्यान आहे बेस्ट

त्यामुळे आपल्या वर्कआऊट सेशनमध्ये एनर्जेटिक राहण्यासाठी तुम्ही ही गाणी आपल्या प्ले लिस्टमध्ये नक्की अॅड करा.

1. मल्हारी - बाजीराव मस्तानी

बाजीराव मस्तानी मधल हे गाणं रिलीज झाल्यापासून खूप जास्त चर्चेत आहे, यात रणवीर सिंहची एनर्जी खूप एक्सट्रीम आहे आणि गाणं बघून आपल्याही मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो.

2. जिद्दी दिल - मेरी कॉम

हे गाणं बॉक्सर मेरी कॉम यांच्यावर प्रेरित असलीने या गाण्याने आपल्याला प्रेरणा मिळते, या गाण्याचे बोल आपल्यातला आळस बाजूला सारून उत्साही बनवतात.

Gym Playlist
Isro vs Microsoft : इस्रो आणि मायक्रोसॉफ्टची जुगलबंदी, दोन दिग्गज एकत्र आल्याने घडेल नवीन चमत्कार

3. सुलतान टायटल सॉन्ग - सुलतान

कुस्ती, आखाडा, वर्कआऊट यावरच ही पूर्ण मूव्ही आहे. वर्कआऊट करतांना हे गाणं तुम्हाला जास्त रिलेट होऊ शकत.

4. अभी तो पार्टी शूरु हुई हे - खूबसूरत

एक प्रॉपर बीट वाल गाणं आणि बादशाहचा रॅप एनर्जी क्रिएट करायला आणखीन काय हवं? याचे बिट्स आपल्या वर्कआऊटशी खूप जास्त मॅच करतील.

Gym Playlist
Kopeshwar Temple : 95 हत्तींनी उचलून धरलेलं कोल्हापूरातील “हे” मंदिर बघितलय का?

5. सूट सूट करता - हिन्दी मिडियम

सूट सूट करता हे गाणं गुरु रंधावा आणि रजत नागपाल यांनी कंपोज केल आहे आणि गुरु रंधावा यांनी त्याला गायल आहे, मुली या गाण्यावर छान वाईब करू शकतील.

6. मनाली ट्रान्स - द शौकिन्स

हे गाणं क्लब आणि जिममध्ये रेग्युलर वाजणाऱ्या गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं खुप फेमस आहे. तुम्ही हेडफोन्स लावून सुद्धा या गाण्यावर सुंदर वाईब करू शकतात.

Gym Playlist
Gajar Halwa Recipe: असा बनवाल गाजरचा हलवा तर बोटं चाटत रहाल...

7. जिंदा - भाग मिल्खा भाग

हे खूप मोटिवेशनल गाणं आहे; जर तुमचा एक्सरसाईज करण्याचा मूड होत नसेल तर तुम्ही हे गाणं ऐकू शकतात. याने तुम्हाला उत्साह आणि इनस्पीरेशन दोघंही मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com