Hair Care : केसांच्या समस्यांवर आचार्य बालकृष्ण यांनी शोधलाय बेस्ट फॉर्म्युला, प्रयोग करा अन् काळे कुळकुळीत केस मिळवा

नैसर्गिकरित्या वापरलेले उपाय कधीही हानिकारक ठरत नाहीत
Hair Care
Hair Careesakal

  Hair Care :

आजकाल प्रत्येक वयोगटातील व्यक्ती केसांच्या समस्यांनी ग्रस्त आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, टक्कल पडणे यामुळे तर लोक ग्रासलेले आहेत. केसांच्या या समस्यांवर औषधोपचार आणि ट्रिटमेंट करूनही फरक पडत नाही.

केस गळणे कमी आले की त्यात कोंडा व्हायला लागतो. कोंडा कमी आली की केसांमध्ये टक्कल पडते. वाढ खुंटते. केस पातळ होतात. अशा समस्यांवर नैसर्गिक उपाय केले तर ते फायद्याचे ठरणार आहे. कारण, हानिकारक उपाय केल्याने केसांचे नुकसान होते. (Hair Care Tips)

Hair Care
Hair Care Tips : हिवाळ्यात तुमचेही केस खूप गळतात? मग, ‘या’ घरगुती उपायांची घ्या मदत

पण नैसर्गिकरित्या वापरलेले उपाय कधीही हानिकारक ठरत नाहीत. कारण, आपल्या शरीराला नैसर्गिक घटकांची सवय असते. जेव्हा या पदार्थात केमिकल मिक्स केले जाते.

तेव्हा ते हानिकारक ठरतात. त्यामुळे, केसांसाठी एक फॉर्म्युला शोधला आहे पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी. त्यांनी सांगितलेले उपाय करून तुम्ही केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकता. (Hair Loss)

Hair Care
Hair Care Tips : हिवाळ्यात तुमचेही केस खूप गळतात? मग, ‘या’ घरगुती उपायांची घ्या मदत

केसांच्या वाढीसाठी

गांधिलमाशी (पिवळी मधमाशी) चे पोळे (ज्यातून मधमाशा उडून गेल्या आहेत) 5 ग्रॅम आणि देशी जास्वांदाच्या 10-15 पानांना अर्धा लीटर नारळाच्या तेलात टाकून मंद आचेवर उकळवावे, उकळता उकळता जेव्हा पोळ काळे पडेल तेव्हा भांडे आगीवरून खाली उतरवावे. थंड झाल्यावर तेल गाळून बाटलीत भरून ठेवावे. दररोज हलक्या हाताने या तेलाने डोक्यावर मालिश केल्यास केस उगवतात. (Home Remedies)

Hair Care
Hair Care : केसांना निरोगी ठेवण्यासाठी आतून पोषणही गरजेचं; फायद्याची ठरेल ही होममेड स्मूदी.. वाचा रेसिपी

केसातील कोंडा जाण्यासाठी

200 ग्रॅम कडुनिंबाच्या पानांना कुटून 200 मिली तीळ तेलात मिसळून मंद आचेवर Gangr हळू-हळू शिजवावे. शिजवून थंड झाल्यावर गाळून वाटलीत भरून ठेवावे. हे तेल डोक्यात लावण्याने कोंडा व केस गळणे इत्यादी रोग दूर होतात. डोक्यात सोरायसिस किंवा फोड-पुटकुळ्या झाल्यावर हे तेल लावल्यास शीघ्र फायदा मिळतो.

  • टाकणखारचे फूल - 5 ग्रॅम (1 छोटा चमचा)

  • खोबरेल तेल - 5 मिली (1 चमचा)

  • दही - 15 मिली (3 चमचा)

  • लिंबाचा रस - 5 मिली

या तिन्ही वस्तू योग्य प्रकारे एकत्र करून केसात लावावे. सुमारे । तासानंतर केस धुवून घ्यावे. त्याच बरोबर आश्रमात तयार केल्या गेलेल्या दिव्य केश तेलाचा वापर केल्यास शीघ्र फायदा होतो.

Hair Care
Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

केसांना काळे करण्यासाठी

  1. मेंदी पावडर - 20 ग्रॅम

  2. कॉफी पावडर - 3 ग्रॅम

  3. दही -  25 ग्रॅम

  4. लिंबाचा रस - 4 चमचे

  5. काथ - 3 ग्रॅम

  6. ब्राम्ही चूर्ण - 10 ग्रॅम

  7. आवळा चूर्ण – 10 ग्रॅम

वरील सर्व वस्तू पाणी घालून एकत्र कराव्यात आणि केसांना लावाव्यात. दोन तासांनी केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. केसांना शाम्पू वापरू नका. यामुळे केस रेशमी, दाट आणि काळे होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com