Benefits of Red Grapes: लाल द्राक्षांचे अनेक फायदे! वजन कमी होईल, डायबिटीज दूर पळेल अन् बरंच काही, वाचा सविस्तर

लाल रंगाच्या द्राक्षांच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका टाळता येतो.
red grapes
red grapes sakal

द्राक्षे हे सगळ्यांचे आवडते फळ आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की कोणत्या रंगाच्या द्राक्षांमध्ये सर्वात जास्त रोगांशी लढण्याची क्षमता असते. तज्ञांच्या मते, सर्व द्राक्षांमध्ये, लाल रंगाची द्राक्षे सर्वात मोहक आहेत. लाल द्राक्षांचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.

लाल द्राक्षे युरोपियन देशांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. त्यापासून रेड वाईन बनवली जाते. पण लाल द्राक्षांचा प्रादुर्भाव भारतात कमी आहे. लोकांना त्याची फारशी माहिती नाही. पण लाल द्राक्षे ही गुणांची खाण आहे. लाल द्राक्षांमध्ये सर्वाधिक अँटिऑक्सिडंट्स असतात.

लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते. याशिवाय एक कप लाल द्राक्षात 52 कॅलरीज, 1 ग्रॅम प्रोटीन, 0 ग्रॅम फॅट, 14 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 1 ग्रॅम फायबर असते. लाल द्राक्षांमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे ते अनेक रोगांचा धोका कमी करते. चला जाणून घेऊया लाल द्राक्षाचे फायदे.

1. हृदयविकार - लाल द्राक्षांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे रक्तवाहिन्यांना आराम देतात आणि हृदयाच्या स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

2. डायबिटीज कंट्रोल- लाल द्राक्षांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण पुरेसे असते, असे असूनही ते रक्तातील साखर वाढवत नाही तर कमी करते. जरी काही लोक मधुमेहामध्ये लाल द्राक्षे खूप गोड असल्याने खाऊ नका असा सल्ला देतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण लाल द्राक्षांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. याचे कारण म्हणजे लाल द्राक्षे लगेच रक्तातील साखर वाढवत नाहीत. त्यात अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे ते रक्तातील साखर वाढू देत नाही.

red grapes
Fasting Tips: दिवसभराचा उपवास सोडताना 'हे' पदार्थ खाण्याची चूक करु नका; आरोग्याचं होईल नुकसान

3. वजन कमी - ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी लाल द्राक्षे फायदेशीर आहेत. लाल द्राक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते ज्यामुळे भूकेची भावना मोठ्या प्रमाणात कमी होते. यासोबतच लाल द्राक्षांमध्ये भरपूर पाणी असते ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांना लाल द्राक्षाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.

4. डोळे निरोगी राहतात- लाल द्राक्षांचे नियमित सेवन केल्याने डोळे निरोगी राहतात. लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय लाल द्राक्षांमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स डोळ्यांच्या पेशींना आराम देण्यास मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com