Healthy Recipe
Healthy Recipeesakal

Healthy Recipe : जेव्हा जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा तितक्याच तोडीचा हा पदार्थ खा, पोटही भरेल आणि कामही वाचेल!

मखान्यांची ही रेसिपी मुलांना आवडणारी आहे

Healthy Recipe :

काहीवेळा आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा येतो. किंवा काहीवेळा आपल्याकडे जेवण बनवण्या इतका वेळही नसतो. तेव्हा अचानक कोणी मित्र घरी आले, किंवा मुलांना पटकन काय बनवून देता येईल. जे दोन मिनिटात होणाऱ्या नुडल्सपेक्षा जास्त हेल्दी असेल असा पदार्थ शोधत असाल. तर आज तुमचा शोध संपला आहे..

हेल्दी पदार्थात सगळ्यात टॉपला असलेला पदार्थ म्हणजे मखाना. तर हाच मखाना तुमची भूक घालवणारा आणि तितकेच प्रोटीन देणारा आहे. मखाना तुमची रात्री अपरात्रीची भूक तर पळवेलच. पण त्यासोबत तो तुम्हाला तितकेच जास्त प्रथिनेही देते. (Healthy Recipe)

Healthy Recipe
Healthy Copper Brass Utensils: आरोग्यदायी तांबे, पितळाच्या भांड्यांना सोन्याचे दिवस! ग्राहकांचा पुन्हा खरेदीकडे कल

लहान मुलं शाळेतून आली किंवा त्यांची छोटी भूक भागवण्यासाठी दोन मिनिटात बनणाऱ्या नुडल्स आणि इतर पॅकेट फूडपेक्षा मखाने चांगले आहेत. मखान्यांची ही रेसिपी मुलांना आवडणारी आहे. त्यासोबत मुलांच्या पोटात दुधही जाईल. त्यामुळे तुम्हाला वेगळा आणि हेल्दी पदार्थ बनवल्याचे समाधानही मिळेल.

ही रेसिपी कशी बनवायची हे पाहुयात

ही स्पेशल रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त मखना दुधात भिजवावा लागेल. जर तुम्हाला थंड दूध आवडत असेल तर तुम्ही ते थंड दुधात मिसळून खाऊ शकता. पण जेव्हा तुम्ही ते गरम दुधात भिजवून खाल तेव्हा तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो कारण मखनामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. (Recipe)

मखणा गरम दूध सहज शोषून घेतो. यामुळे त्याचे फायबर आणखी वाढते, जे खाल्ल्याबरोबर तुमचे पोट भरते आणि तुम्हाला भूक लागत नाही.

Healthy Recipe
Breakfast Recipe: सकाळी उरलेल्या इडलीपासून झटपट बनवा चवदार उपमा

मुलांच्या आवडिची टेस्ट या रेसिपीला देण्यासाठी तुम्ही या दुधात चॉकलेट क्रश, चॉकलेट पावडर आणि साखरही घालू शकता. जर हा पदार्थ अधिक हेल्दी बनवायचा असेल तर दूध मखाना आणि गोडवा वाढवण्यासाठी थंड दुधात मध घालू शकता. 

Healthy Recipe
Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवा थट्टे इडली, एकदम सोपी आहे रेसिपी

दूध – मखाना खाण्याचे फायदे

तुम्ही रात्री किंवा नाश्त्यात दूध आणि मखना खाऊ शकता. हे दोन्ही वेळेस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दुधात प्रथिने भरपूर असतात, तर माखणामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने असतात. हे दोघे मिळून शरीराला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात आणि हाडे मजबूत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com