रंग खेळल्यानंतर मुलांच्या त्वचेची अशी घ्या काळजी!

मुलांची त्वचा मुलायम असते त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
holi kids skin care tips
holi kids skin care tips

होळी उद्यावर आली आहे. कोरोनाचे प्रमाण जरा कमी झाल्याने मुलांना त्यांच्या मित्रांबरोबर खूप काळानंतर होळी खेळायला मिळणार असल्याने त्यांच्यात उत्साह आहे. मुलांना खेळायला खूप आवडतं. त्यात होळी अनेक मुलांना आवडते. खेळण्यात ती मुलं इतकी हरवून जातात की त्यांना नंतरच्या समस्यांचे भानही राहत नाही. अशावेळी आई-वडिलांनी त्यांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण नाहीतर मुलांना त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मुलांची त्वचा मुलायम असते. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

holi kids skin care tips
होळी साजरी करण्यामागचा इतिहास अन् विज्ञान जाणून घ्या
kids holi
kids holi

हे लक्षात ठेवा

होळी खेळल्यानंतर मुलांना आंघोळीसाठी कोमट पाणी द्या. त्यामुळे त्यांच्या त्वचेवरून मळ आणि रंग आरामात निघून जातील. जास्त गरम पाण्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे अधिक काळजी घ्या.

आंघोळीनंतरही मुलांच्या त्वचेवरून रंग जात नाही. अशावेळी तिळाचे तेल त्वचेवर लावून हलक्या हाताने स्क्रब करा. तुम्ही तिळाऐवजी नारळाचे तेलही वापरू शकता. त्यामुळे त्यांच्या त्वचेवरचा रंगही निघेल. तसेच त्वचेवर खाज सुटणे, जळजळणे आदी समस्या निर्माण होणार नाहीत.

होळी खेळल्यानंतर मुलं उन्हात बसतात. असं केल्याने मुलांना त्वचेविषयी समस्या निर्माण होऊ शकता. त्यापेक्षा आंघोळ केल्यानंतर मुलं उन्हात बसली तर खाज सुटणे, जळजळ आदी समस्यांपासून ते वाचू शकतात.

holi kids skin care tips
Holi 2022 : होळी खेळताना जपा डोळे! या पाच गोष्टी लक्षात ठेवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com