उन्हाळ्यात किती ग्लास पाणी प्यावं? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water

उन्हाळ्यात किती ग्लास पाणी प्यावं? जाणून घ्या

शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. दिवसातून आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. सध्या उन्हाळ्यात शरीराला पाण्याची भयंकर आवश्यकता असते. शरीरात थोडी जरी पाण्याची कमतरता जाणवली तरी याचे शरीरावर विपरीत परीणाम होतात. पण तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्यात तुमच्या शरीराला किती पाणी आवश्यक असते. (how much glass of water should we drink in summer)

हेही वाचा: उन्हाळ्यात चेहरा टॅन होतोय? कैरीचं घरगुती फेसपॅक वापरा

उन्हाळ्यात किती पाणी प्यावं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. सध्या उन्हाची झळ सुरु आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढतोय. अशात प्रत्येकजण उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.या कडक उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेट ठेवायचे असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.

हेही वाचा: आयुर्वेद म्हणतं, उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन करा, थकवा होणार गायब

उन्हाळ्यात इतके ग्लास पाणी प्या

उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे. पण आपण अनेकदा कामात इतके व्यस्त होतो की ते पाणी पिणे विसरतो. उन्हाळ्यात पाणी न पिणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. उन्हाळ्यात व्यक्तीने 10 ग्लास पाणी प्यावे.

हेही वाचा: एकाच कंपनीत चक्क 84 वर्षे नोकरी; गिनीज बुकात नोंद

पाणी पिण्याचे फायदे

१.पाणी पिल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते

२.पाणी पिल्याने वजन कमी होते.

३.पाणी शरीराला हायड्रेट ठेवते

४. पाणी शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करते

५. शरीराला पुरेसे पाणी मिळाल्यास त्वचा ओलसर राहते.

६. पाणी प्यायल्याने हाडे मजबूत राहतात

Web Title: How Much Glass Of Water Should We Drink In Summer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top