Skin Care: उन्हाळ्यात टिकली लावल्याने पिंपल्स होऊ शकतात... आजच करा हे उपाय...

जास्त काळ टिकली ठेवल्यास त्वचेला नुकसान होऊ शकते. ज्यामुळे कपाळावर खाज सुटणे सुरू होते.
Skin Care
Skin Careesakal

Skin Care: टिकलीला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यात जर टिकली पारंपारिक पोशाख (traditional wear) म्हणजे साडी, सूट यावर लावली असेल तर आणखीच उठून दिसते. पूर्वीच्या काळी स्त्रिया टिकलीऐवजी कुंकू लावायच्या जे नैसर्गिकरित्या तयार केले जात असे, पण आता आर्टिफिशयल टिकलीमुळे कपाळावर एलर्जीची  समस्या सुरु होते. कपाळावर तांबड्या रंगाचे ठसे येतात जे फार वाईट दिसतात. अनेकांना तर पुरळ येते. त्यात उन्हाळ्यात तर विचारायलाच नको. टिकलीमुळे झालेली एलर्जी (skin care tips) कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घ्या.

टिकलीमुळे ॲलर्जी का होते

टिकलीमुळे होणार्‍या ॲलर्जीला डर्मेटाइटिस म्हणतात. टिकली तयार करताना, पैरा टर्शियरी ब्यूटिल फिनॉल नावाचे रसायन वापरले जाते. जर तुमची त्वचा ही संवेदनशील (beauty tips for sensitive skin) असेल तर त्यावर रिएक्शन होते. जास्त काळ टिकली ठेवल्यास त्वचेला नुकसान होऊ शकते. ज्यामुळे कपाळावर खाज सुटणे सुरू होते.

अ‍ॅलर्जीवरील उपाय

टिकली लावल्यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी होत असल्यास वेळीच टिकलीचा वापर करणं थांबवावे. अन्यथा गंभीर त्वचा विकार उद्भवण्याची शक्यता असते.

टिकली ऐवजी दुसऱ्या पर्याय म्हणजेच नैसर्गिकरित्या तयार केलेल्या कुंकवाचा तुम्ही वापर करु शकता. पण यामुळे तुमच्या त्वचेला कोणताही अपाय होणार नाही. 

कमी प्रमाणात गोंद असणाऱ्या टिकलीचा करावा वापर

महत्त्वाचे म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कपाळावरील टिकली काढावी आणि चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्वचेवर क्रीम लावावे. 

आपल्या कपाळाला जोरजोरात घासू नये. हलक्या हाताने फेस वॉश लावावे. 

Skin Care
Skin Care: उन्हाळ्यात घरच्या घरी फळांपासून बनवा नॅचरल फ्रूट फेसपॅक

ॲलर्जीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपचार

खोबरेल तेल

नारळ तेल त्वचेच्या ॲलर्जीसाठी सर्वोत्तम आहे. हे तेल नैसर्गिकरित्या कार्य करते आणि ॲलर्जीमुळे होणारी खाजेजी समस्या कमी करते. हे लावल्यास खाज सुटणे तसेच कपाळावर पडलेले पांढरे निशान देखील कमी होतात.

तीळाचे तेल

जर आपल्याला टिकलीमुळे ॲलर्जी होत असेल तर तीळ तेल लावा. यासाठी 2-3 थेंब तीळ तेल कपाळावर आणि चेहऱ्यावर लावा आणि चांगली मालिश करा.

कोरफड 

आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्किन केअर (Skin Care) रुटीनमध्ये कोरफडीचा (aloevera gel) समावेश करावा. कोरफडमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. यामध्ये अँटी सेप्टिक, अँटी बॅक्टेरिअल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि असे कित्येक नैसर्गिक गुणधर्म आहेत, जे आपल्या त्वचेसाठी पोषक आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि फॉलिक अ‍ॅसिड यासारख्या पोषण तत्त्वांचाही समावेश आहे. आपल्या त्वचेसाठी कोरफड टॉनिकप्रमाणे कार्य करते. 

Skin Care
Skin Care Tips : सुंदर त्वचेसाठी ट्राय करा डाळिंबाचा फेस पॅक, त्वचा होईल मुलायम आणि चमकदार

टिकली लावण्याचे फायदे:

डोक्याला शांतता मिळते

भुवयांच्या मधोमध जिथे आपण टिकली लावतो त्या भागाची रोज मालिश केली पाहिजे. हे या भागातील स्नायू आणि मज्जातंतूंना आराम देण्यास मदत करते. यामुळे आपल्या शरीरावर शांततेचा प्रभाव पडतो. जेव्हा तुम्ही तणावाच्या स्थितीत असता तेव्हा तुम्ही शांत राहण्यासाठी आणि एकाग्र मनासाठी दररोज टिकली लावू शकता.

डोकेदुखी कमी होते

आपल्या कपाळावर एक विशिष्ट जागा किंवा बिंदू असलेल्या भागावर टिकली लावावी. हा पॉइंट आपल्याला डोकेदुखीपासून त्वरित आराम देतो. याचे कारण असे आहे की नसा आणि रक्तवाहिन्यांचे अभिसरण आहे. त्यामुळे या बिंदूची मालिश केल्यावर आपल्याला तात्काळ आराम मिळतो.

एकाग्रता वाढते

कपाळाच्या मध्यभागी पाइनल ग्रंथी असते. या भागावर टिकली लावल्यास ही ग्रंथी वेगाने काम करू लागते. यामुळे मन शांत होते. कामात एकाग्रता वाढते. यामुळे राग आणि तणाव कमी होतो.

Skin Care
Skin Care: उन्हाळ्यात मेकअप करण्यापूर्वी या 4 गोष्टी ठेवा लक्षात

साईनस ठीक होते

टिकली लावल्याने सायनस आणि नाकातील सूज कमी करण्यास तसेच ब्लॉक केलेल्या नाकाला आराम देण्याचे फायदे होतात.

सुरुकत्या कमी होतात

टिकली लावल्याने चेहऱ्यावरील स्नायूही सक्रिय होतात. त्यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरणही वाढते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. जिथे टिकली लावली जाते त्या ठिकाणी सुप्राट्रोकियल नर्व्ह असते. ज्यावर दाब दिल्यास त्वचेच्या सुरकुत्या निघून जातात आणि आपला चेहरा तरुण दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com