मुलांची चिडचिड वाढलीय? पालकांनो लक्ष द्या!

बहुतांश वेळा काही कारण नसताना मुलं चिडचिड करायला लागतात.
Child Care Tips
Child Care TipsSakal

बहुतांश वेळा काही कारण नसताना मुलं चिडचिड करायला लागतात. ही मुलांची रोजचीच सवय असे म्हणून आई वडील त्यांच्याकडे कानाडोळा करतात. मात्र अनेकदा मुलांचं वागणं हाताबाहेर जाऊन ते हिंसक होतात, अवेळी जिद्द करायला लागतात. अशा परिस्थितीत मुलांना (Children) मारावे की समजावून सांगावे असा गोंधळ निर्माण होतो. मुलांमधील हा चिडचिडपणा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकतो. त्यासाठी पालक म्हणून आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. (Increased irritability of children? Parents pay attention!)

Child Care Tips
कोरोनामध्ये मुलांचा लेखनाचा वेग झालाय कमी; जाणून घ्या तज्ज्ञांच्या सूचना

संवादाचे शस्त्र वापरा-

मुलं अधून-मधून चिडतात तेव्हा त्यांना रागावू नका. त्यांची अडचण समजून घ्या. त्यांच्यासोबत संवाद साधा. त्यांच्या चिडण्यामागचे कारण समजले की त्यावर सहजच उपाय काढता येऊ शकतो.

स्क्रिनिंग टाईम मॅनेजमेंट करा-

हल्ली स्मार्टफोन, इंटरनेट, टीव्ही आणि व्हिडिओ गेममध्ये मुलं तासंतास घालवतात. यामुळे त्यांच्या अंतर्मनावर विपरित परिणाम होतो. मेंदूच्या विकासात बाधा येते. हिंसक गेम्स आणि व्हिडिओमुळे हिंसक प्रवृत्ती वाढते. त्यामुळे मोबाईल आणि टीव्ही वापरण्याचे टाईम ठरवून घ्या. जेणेकरून गॅजेट्स वापरण्याचे प्रमाण लिमिटेड होईल.

Child Care Tips
फक्त ०.१ टक्के गर्भवती कोरोना ग्रस्त

स्वतःवरही नियंत्रण ठेवा-

मुलं हे आई-वडिलांचे अनुकरण करतात. तुम्ही ताणतणावाच्या वेळी जशा प्रतिक्रिया देता, तेच कॉपी करण्याचा प्रयत्न मुलं करतात. त्यामुळे मुलांसमोर तोलून-मापून वागण्याचा प्रयत्न करावा. सर्वप्रथम स्वतःचे निरिक्षण करून आपल्या चिडखोर स्वभावावर नियंत्रण मिळवण्याचे मिळवावे.

तुम्ही शांत रहा –

मुलं चिडचिड करतात, अशा वेळी तुम्ही शांत रहा. मुलांसाठी आई बाबा हेच त्यांच्यासाठी विश्वासाची जागा असतात. त्यामुळे ते तुमच्या समोरच चिडचिड करणार. अशावेळी मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घ्या. परिस्थितीवर ताबा मिळवा आणि मुलांच्या अपेक्षांचा आदर करा.

दुष्परिणाम-

- संयमाच्या भावनेचा लोप

-वाद निर्माण होण्याची शक्यता

-एकलकोंडं होणं

-नाते संबंधामध्ये दुरावा वाढतो

-एकाग्रता कमी होते

-चुकीच्या निर्णयाची शक्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com