Kitchen Cleaning Tips : किचनमधील फर्निचरवर जमलेला तेलकट थर म्हणजे डोकेदुखीच; असे करा साफ!

किचन ट्रॉली, फर्निचववर बुरशी आणि तेल मसाल्यांनी सहज डाग पडतात
Kitchen Cleaning Tips
Kitchen Cleaning Tipsesakal

Kitchen Cleaning Tips : सोसायटीत राहणाऱ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये अमृताच्या घरीच लोकांची जास्त वर्दळ असते. त्यातही प्रत्येक महिन्याची किटी पार्टी असो वा कोणती मिटींग ती अमृताच्याच घरी ठेवली जाते. अर्थात अमृताचा स्वभाव तर याला कारणीभूत आहेच. पण, तिची घर स्वच्छ करण्याच्या पद्धतीचेही सगळे कौतूक करतात. अमृतासारखंच तुमचंही कौतूक व्हावं असं वाटत असेल तर तिच्याकडूनच घ्या किचन टिप्स.

पुर्वीच्या काळात किचनमध्ये असलेला संसार, भांडी कुंडी, उघड्यावरच ठेवली जायची. पण तरीही ती चकचकीत होती. आता किचनमध्ये ट्रॉलीज, कंटेनर बनवले जातात की जे भांड्याना व्यवस्थित लावून ठेवतात. पण त्यामुळे किचनमध्ये अधिक पसारा आणि तेलकट थर वाढला आहे. यामुळे महिलांची डोकेदुखी वाढली आहे. कारण, किचन ट्रॉलीजची शाईन टिकवणं अशक्यच बनलं आहे.

किचन ट्रॉली, फर्निचरवर बुरशी आणि तेल मसाल्यांनी सहज डाग पडतात. स्वयंपाकघरातील कॅबिनेटवरील हे डाग अनेक पटींनी जास्त हट्टी, चिकट होतात, कारण स्वयंपाक करताना गॅसची उष्णता आणि ओलसर धूर वाढतो. अशा स्थितीत ती साफ करणे अवघड होऊन बसते. जर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात बनवलेले कॅबिनेट स्वच्छ करण्याची काळजी वाटत असेल तर या टिप्स वाचा.

Kitchen Cleaning Tips
Kitchen Cleaning Hacks मायक्रोवेव्ह, किचन ओटा ठेवा नव्यासारखा स्वच्छ

फर्निचर किती वेळा स्वच्छ करावे

स्वयंपाकघरातील फर्निचर नेहमी चमकदार दिसण्यासाठी. आठवड्यातून किमान एकदा त्यांच्या पृष्ठभागावर कोरड्या मायक्रोफायबर कापडाने धूळ घालणे महत्वाचे आहे. तसेच महिन्यातून एकदा पूर्णपणे स्वच्छ करा. असे केल्याने फर्निचर, ट्रॉली, किचन कट्ट्यावर चिकटपणा येत नाही.

या वस्तू करतील मदत

प्लायवुड फर्निचर पॉलिश करण्यासाठी आपल्याला स्टोअरमधून वेगळे साफसफाईचे द्रव खरेदी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या घरात आधीपासून असलेल्या वस्तूंसह तुम्ही साफसफाईचे उपाय बनवू शकता.

यासाठी 1 कप पाणी, 1/4 कप व्हिनेगर, 2 चमचे खोबरेल तेल आणि डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब एका भांड्यात मिसळा आणि चांगले मिसळा.

कॅबिनेट कसे स्वच्छ करावे

किचनमध्ये बनवलेले प्लायवूड फर्निचर सोल्युशनने साफ करण्यापूर्वी आतील सर्व वस्तू काढून एकदा धूळ द्या. आता तयार मिश्रणात मायक्रोफायबर कापड किंवा स्पंज बुडवा आणि हलक्या हाताने घासून कॅबिनेट स्वच्छ करा. नंतर स्वच्छ सुती कापडाने पुसून टाका. असे केल्याने चिकटपणा तर दूर होतोच पण नवीन सारखी चमकही येते.

Kitchen Cleaning Tips
Kitchen Hacks : किचन ट्रॉलीचा महाहट्टी चिकटपणा काही मिनिटांत घालवा या उपायांनी!

बेकिंग सोडा आणि लिंबू

एका स्प्रे बाटलीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा १ लिंबाचा रस आणि १ कप कोमट पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. आता ते कॅबिनेटमध्ये चांगले शिंपडा आणि 5-10 मिनिटे सोडा. नंतर ते स्पंज किंवा ब्रशने स्वच्छ धुवा आणि स्वच्छ ओलसर कापडाने पुसून टाका. आता कॅबिनेट थोडावेळ उघडे सोडा, जेणेकरून ते पूर्णपणे कोरडे होईल. जर तुमची फर्निचर वारंवार घाण होत असेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता.

लिंबू आणि खाण्याचा सोडा

लिंबू आणि खाण्याचा सोडा स्वयंपाक घरात मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही या साधनांचा वापर करून कधीही तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ करू शकता. यासाठी पाण्यात चमचाभर सोडा मिसळा आणि अर्ध लिंबू पिळा. हे मिश्रण चिकट डागांवर लावा आणि कापडाने पुसून काढा. जर एखादा डाग खूपच चिकट असेल तर तुम्ही थेट लिंबावर सोडा लावून त्यानेच तो डाग रगडून काढू शकता.

Kitchen Cleaning Tips
Kitchen Hacks : नारळ फोडण्यासाठी मनस्ताप करून घेऊ नका, या ट्रिक्स येतील कामी!

डिश वॉशिंग लिक्विड

किचन स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग म्हणजे भांडी घासण्याचे लिक्विड वापरणे. घरात भांड्यासाठी साबण आणि तेलकट भांड्यांसाठी खास लिक्विड सोप असतो. हे लिक्विड थोड्या पाण्यात मिसळून तुम्ही किचनच्या टाईल्स, किचनमधील कपाटे स्वच्छ करू शकता. कारण या मिश्रणाने तुमचे काम सहज आणि झटपट होऊ शकते.

मीठ

मीठ ही स्वयंपाकघरातील अशी एक वस्तू आहे ज्यामुळे तुम्ही किचनधील कोणताही चिकट डाग कमी करू शकता. मीठाच्या पाण्यामुळे स्वयंपाक घर स्वच्छ आणि निर्जंतूक तर होतेच. शिवाय त्यामुळे स्वयंपाक घरात माशा, कीटक, डासदेखील येत नाहीत. जर तुमच्याकडे जाडे मीठ असेल तर तुम्ही ते किचनची खिडकी, सिंकचे आऊटलेट या ठिकाणी ठेवू शकता. स्वयंपाक घरातील लादी आणि टाईल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मीठाचे पाणी नक्कीच वापरू शकता.

Kitchen Cleaning Tips
Kitchen Hacks : घरातल्या किचनमध्ये छोटेसे बदल करा आणि हजारो रुपये वाचवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com