Lavender Marriage म्हणजे काय? अशी लग्नं टिकतात का ते जाणून घ्या

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा निर्णय असतो
Lavender Marriage
Lavender Marriage

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. एकमेकांना समजून घेत, विविध समस्यांचा सामना करत, अनेक चांगल्या वाईट घटनांमधून घडत जात त्यांचा संसार फूलत जातो. पण लग्नसंस्थेत (Marriage) काळानुरूप खूप बदल होतो आहे. याच बदलत्या लग्नसंस्थेवर आधारित राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा 'बधाई दो' हा चित्रपट खूप गाजतो आहे. हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित आहे. सेक्सविषयी आता कुठे समाजात चर्चा घडायला सुरूवात झाली आहे. पण बधाई दो हा चित्रपट अत्यंत वेगळ्या धाटणीचा आहे. या चित्रपटात राजकुमार राव याने शार्दूल ठाकूर या गे मुलाची आणि भूमी पेडणेकर हिने सुमन सिंग या लेस्बिअन मुलीची (LGBTQ) भूमिका साकारली आहे. हे दोघे लग्न करतात तेव्हा काय होतं ते सांगणारा हा चित्रपट आहे. यातून Lavender Marriage चा मुद्दा प्रकर्षांने समोर आला आहे.

Lavender Marriage
फक्त 20 सेकंद मिठी मारा, शरीरात होणाऱ्या पाच बदलांचा अनुभव घ्या!

‘लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणजे काय? (What’s Lavender Marriage)

गे किंवा लेस्बिअन म्हणजे काय हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. पण चित्रपटात दोन्ही कलाकार वैयक्तिक आयुष्य आणि लैंगिक आवडीनिवडी लपवण्यासाठी लग्न करतात असे दाखवले आहे. म्हणजेच जेव्हा समाज आणि कुटूंबाला दाखविण्यासाठी म्हणून गे मुलगा- लेस्बियन मुलगी लग्न करतात. अशाप्रकारे केलेले लग्न हे समलैंगिकतेशी संबंधित असल्याने त्याला ‘लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणतात. समाजातील आपली प्रतिष्ठा टिकून राहावी, लोकांचे टोमणे टाळण्यासाठी तसेच लैगिक आवड लपविण्यासाछी आजकाल अनेक कपल्स अशाप्रकारचे लग्न करतात, असे तज्ज्ञ सांगतात. असे म्हणताता की, की लॅव्हेंडर रंग समलैंगिकतेशी संबंधित आहे.

Lavender Marriage
'हे' तीन पदार्थ खा; घोरण्याच्या आजाराचा त्रास कमी करा!

‘लॅव्हेंडर मॅरेज’ ची भारतातील स्थिती (Lavender marriage in India)

दोन प्रौढ समलैंगिकांचे संबंध ६ सप्टेंबर २०१८ रोजी न्यायालयाने कायदेशीर केले होते. न्यायालयाने कलम ३७७ मधील ती तरतूद काढून टाकली होती, ज्यामध्ये एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींना संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. तरीही अनेकांना कुटुंब आणि समाजाच्या भीतीने लैंगिक आवड व्यक्त करणे जमत नाही. पण आता गेल्या काही वर्षांत भारतात अनेक समलिंगी जोडप्यांचे विवाह होत असून समाजातील विचार बदलू लागले आहेत.

Lavender Marriage
Truecaller वरून तुमचे नाव, मोबाईल नंबर कसा हटवाल? या टिप्स फॉलो करा!
 marriage
marriageesakal

अशाप्रकारे केलेले लग्न टिकते का?

आपल्या समलिंगी जोडीदाराबरोबर संबंध तसेच राहतील या भावनेने अनेक लोकं लग्न करायला तयार होता. पण पार्टनर शोधताना अशाप्रकारे संबंध असलेली व्यक्ती शोधतात. अशी लग्न लॅव्हेंडर मॅरेज गटात मोडतात. असे लग्न झाल्यानंतरही कुटुंबामुळे त्यांच्यात समस्या निर्माण होऊ शकतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे मुलांचा जन्म. कुटुंबिय लग्नानंतर मुले होण्यासाठी मागे लागतात. हा दबाव अशाप्रकारच्या लोकांना त्रासदायक ठरतो.

Lavender Marriage
Weight Loss Tips: नाश्त्याला हे 5 पदार्थ खाऊ नका, वजन होईल कमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com