Sitting Habits : जास्त वेळ एकाच जागी बसून राहिल्याने वाढतो या आजारांचा धोका; वाचा डॉक्टरांचा सल्ला

सतत बसल्याने केवळ कॅलरीजच जमा होत नाही तर हाडांसबंधित आजारांचा देखील धोका वाढतो.
Sitting Habits
Sitting Habitsesakal

Prolonged Sitting May Cause Serious Health Conditions : हल्ली कॉर्पोरेट ऑफिसेसच नव्हे तर शासरकीय ऑफिसेसची बरीच कामे ही स्क्रिनवर चालतात.लॅपटॉप, कंप्युटर ऑपरेट करताना वेळ कसा जातो हे सहसा काम करणाऱ्यालाही सहज कळत नाही. मात्र यामुळे दीर्घकाळ आपण एकाच जागी बसलेले असतो. बऱ्याच वेळ एकाच जागी बसल्याने तुमच्या अडचणींत वाढ होऊ शकते. सतत बसल्याने केवळ कॅलरीजच जमा होत नाही तर हाडांसबंधित आजारांचा देखील धोका वाढतो.

कुठलीही हालचाल न करता जेव्हा तुम्ही एकाच स्थितीत बसलेले असता तेव्हा त्याचा प्रभाव तुमच्या रक्तपुरवठ्यावर आणि रक्तदाबावरही होतो. यामुळे अनेक आरोग्यविषय समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.

गाजियाबादमधील मणिपाल हॉस्पिटलचे कार्डियोलॉजी कंसल्टंट डॉ. अभिषेक सिंह यांच्या मते, दैनंदिन जीवनात लोखसंख्येचा अर्धा भाग बसून काम करणारा आहे. अनेक लोक डेस्कवर स्क्रिनपुढे दीर्घकाळ बसलेले असतात. मात्र दीर्घकाळ एकाजागी बसणे तेवढेच धोकादायक आहे जेवधे धुम्रपान करणे धोकादायक ठरू शकते.

चला तर दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया.

अॅथेरोस्क्लेरोसिसचा धोका

यात धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढतात ज्यामुळे हार्ट डिसीजचा धोका वाढतो. जो व्यक्ती सतत एकाच जागी बसून असतो त्याच्या शरीरात रक्तप्रवाह कमी होतो. आणि शरीरातील फॅट बर्न करणारी प्रणाली मंदावते.

असुरळीत रक्तप्रवाह

दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. शरीराच्या खालील अंगात गाठी निर्माण होऊ शकतात. तसेच, डीप वेन थ्रोम्बोसिस होऊ शकतो आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

Sitting Habits
Office Work : सोमवारी ऑफीसला जायला कंटाळा येतो? ट्राय करा 'या' ट्रिक्स

हाय ब्लड प्रेशर

दीर्घकाळा एकाच जागी बसून राहिल्याने रक्तदाब वाढतो. फिजीकल अॅक्टिव्हिटी आणि ब्लड फ्लोची कमतरता उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरते. हृदयरोगींमध्ये यामुळे जीवाचा धोका वाढतो. रोजच्या एकसंध बसण्याच्या सवयी वगळल्या तर रक्तदाब नियंत्रित ठेवून आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत मिळते.

लठ्ठपणाचा धोका वाढतो

दीर्घकाळ एकाच जागी बसल्याने शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे चरबी वाढते. शिवाय हृदयावर दाब येणे , हाय कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या आजारांचा धोका वाढतो. बसण्याची वेळ कमी करण्याबरोबरच रोज व्यायाम, वजन कंट्रोल करणे यांसारख्या सवयींचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. (Office work)

Sitting Habits
Office Work: लंच ब्रेक नंतर तुम्हालाही येतोय ऑफिसच्या कामाचा कंटाळा? करा 'हे' सोपे उपाय

उभे राहून काम करा

स्टँडिंग डेस्क किंवा अॅडजेस्टेबल वर्कस्टेशन वापर करून बसणे यामुळे यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो.

अॅक्टिव्ह ब्रेक शेड्युल करा

ब्रेक किंवा दुपारच्या जेवणानंतर बसण्याऐवजी फिजीकल अॅक्टिव्हिटी वाढवा. जसे की चालणे. फिरणे, पायऱ्या चढणे, उतरणे

एक्सरसाइज करा

दर आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटांच्या मीडियम इंटेंसिटीची एक्सरसाइज करा. याशिवाय कार्डिओ एक्सरसाइजसुद्धा करा. (Lifestyle)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com