Mahatma Gandhi : पांढरे धोतर घालणारे, काठी घेऊन फिरणारे महात्मा गांधी जगात पॉप्युलर का आहेत?

महात्मा गांधीजींच्या यल्गाराची सुरूवात भारतात नाहीतर दक्षिण आफ्रिकेतून होते
Mahat ma Gandhi
Mahat ma Gandhi esakal

Mahatma Gandhi :

शांतता आणि अहिंसेची काठी हातात घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी सर्वांचेच प्रिय आहेत. केवळ भारतीय लोकं नाहीतर जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक त्यांना ओळखतात. महात्मा गांधीजींनी केवळ अहिंसेचा हात धरून जगण्याची शिवकण लोकांना दिली. त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले ते डगमगले नाहीत.

महात्मा गांधींचे कर्तृत्व आणि त्यांचा जगातील वाढता प्रभाव पाहून महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते की, भविष्यात या पृथ्वीतलावर असा एकच रक्त-मांसाचा मानव जन्माला आला होता, यावर लोकांचा विश्वास बसणार नाही.

Mahat ma Gandhi
Mahatma Gandhi Employment Scheme : 10 हजार मजुरांची 34 कोटींची थकली मजुरी

भारतावर ब्रिटीश सरकारने १५० वर्ष राज्य केलं. राज्य कसलं भारतातील नागरिकांना इंग्रजांनी गुलामच बनवले होते. भारतात महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून ब्रिटीश सरकारला देश सोडण्यास भाग पाडले.

पण त्यांच्या प्रयोगाची सुरूवात भारतात नाहीतर दक्षिण आफ्रिकेतून होते. त्यांनी येथून फुंकलेल्या क्रांतीचा बिगुल जगभर प्रसिद्ध झाला आणि एक प्रभावी भारतीय म्हणून गांधीजी उदयास आले.

Mahat ma Gandhi
Mahatma Gandhi : महात्मा गांधींचे हे 10 विचार बदलतील तुमचे आयुष्य!

पहिली घटना - आफ्रिकेतील तो क्षण

दक्षिण अफ्रिकेत असताना गुजराती व्यापारी अब्दुल्ला शेठ यांनी गांधीजींना त्यांचे वकील बनवले. त्या कामानिमित्तानेच गांधीजी डरबन वरून प्रिटोरियाला प्रवास करत होते. तेव्हा रेल्वेतील इंग्रज सहप्रवाशांनी गांधीजींकडे फर्स्ट क्लासचे तिकिट आहे हे मान्यच केले नाही. एका भारतीय व्यक्तीकडे फर्स्ट क्लासचे तिकीट असूच शकत नाही, असा कांगावा करून ब्रिटिशांनी गांधीजींना मारून रेल्वेतून खाली उतरवले.

हा अपमान सहन न झाल्याने गांधीजींनी प्रिटोरियामध्ये भारतीय लोकांची सभा घेतली. जात-धर्म विसरून एकसंघ व्हा, एकत्र या असे अवाहन बापूंनी त्यावेळी लोकांना केले. त्यामुळे बापूजी आफ्रिकेत प्रसिद्ध झाले.

दुसरी घटना - राजकीय प्रवास

दक्षिण आफ्रिकेत राहण्याचा करार पूर्ण झाल्यानंतर गांधीजी परतण्याची तयारी करत होते. पाच वर्षांसाठी नवीन करार न मिळाल्याने तिथल्या भारतीयांचा छळ करण्यात येत होता. परदेशातील भारतीय ब्रिटिशांच्या दहशतीने हैराण झाले होते. अशा परिस्थितीत त्यांनी भारतात परतण्याचा विचार सोडून दिला. त्यावेळी भारतीयांकडून मतदानाचा हक्क काढून घेण्याबाबत नताल प्रांतीय विधानसभेत चर्चा झाली होती.

परदेशातील भारतीयांनी गांधीजींना याला विरोध करून चळवळीचे नेतृत्व करण्याची विनंती केली. त्यांनी ते मान्य केले आणि गांधीजींनी पहिली राजकीय संघटना स्थापन केली. नाव होते- Natal Indian Congress. ही संघटना अनिवासी भारतीयांचा आवाज बनली.

या दरम्यान, १८९९ मध्ये तेथे राहणारे ब्रिटिश आणि डच यांच्यात युद्ध झाले. युद्धात जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी गांधीजींनी ११०० लोकांची वैद्यकीय टीम तयार केली. ब्रिटिशांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते.

Mahat ma Gandhi
Mahatma Gandhi Punyatithi : आजवर 'या' अभिनेत्यांनी साकारली आहे गांधीजींची भूमिका..

तिसरी घटना - साफ्ताहीकाची सुरूवात 

१९०३ मध्ये त्यांनी परदेशातील भारतीयांचा आवाज बनण्यासाठी ओपिनियन नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. ते वेगाने लोकप्रिय होऊ लागले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते ४ भाषांमध्ये ते छापण्यात आले. दक्षिण आफ्रिकेतील सातत्याने वाढणाऱ्या हालचालींचा प्रभाव भारतातही दिसू लागला होता.

त्याचे प्रतिध्वनी भारतापर्यंत पोहोचत होते. दक्षिण आफ्रिकेतील क्रांतीमुळे त्यांना गांधींऐवजी महात्मा गांधी म्हटले जाऊ लागले. त्यांचे नाव जगभर गाजत होते, याच काळात त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

Mahat ma Gandhi
Mahatma Gandhi: फक्त 'एंटायर पॉलिटिकल सायन्स'च्या विद्यार्थ्यालाच... मोदींनी गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे राजकारण पेटले

चौथी घटना - गांधीजींचा भारतातील प्रवास

भारतात परतल्यानंतर गांधीजींनी अनेक चळवळी सुरू केल्या. १९१७ मध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यातून देशातील पहिली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. गुजरातमधील एका गावाला पुराचा तडाखा बसला तेव्हा शेतकऱ्यांनी ब्रिटिश सरकारला कर माफ करण्याची विनंती केली, पण ते मान्य झाले नाहीत. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी गांधीजींनी 'खेड्याकडे चला' चळवळ सुरू केली.

सरकारने १९१८ मध्ये महसूल कर भरण्याच्या अटी शिथिल केल्या. देशात जेव्हा स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली तेव्हा ब्रिटिशांनी १९१९ मध्ये रोलेट कायदा आणला. या कायद्यात प्रेसवर नियंत्रण ठेवण्याची आणि वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याची तरतूद होती.

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या कायद्याला संपूर्ण देशात विरोध झाला. ब्रिटीशांकडून न्याय मिळणे अशक्य आहे असे महात्मा गांधींचे मत होते, म्हणून त्यांनी १९२० मध्ये असहकार चळवळ सुरू केली.

Mahat ma Gandhi
Mahatma Gandhi : "इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर नाही तर .. "

पाचवी घटना - चले जाव आंदोलन

१९४२ मध्ये महात्मा गांधींचे चले जाव आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे भारतीय लोक एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांना हा देश सोडून जाण्यास प्रवृत्त केले. याच आंदोलनात ‘करो या मरो’ च्या घोषणाही देण्यात आल्या.

या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १५ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. 

सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला.  

या आंदोलनाने देशाच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकून इतिहास घडवला. भारताची गुलामगिरीतून मुक्तता झाली. गांधीजी जगभर लोकप्रिय झाले आणि एक प्रभावी व्यक्तिमत्व बनले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com