
Health Tips : वजन कमी करण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. अनेकजण खाणे-पिणे बंद करतात, तर अनेकजण जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळतात. अनेकदा तुम्ही असंही ऐकलं असेल की वजन कमी करण्यासाठी जंक फूड खाणं बंद करावं आणि आहारावर नियंत्रण ठेवावं. असं केल्यावरही वजन कमी होत नसल्याची तक्रार अनेकजण करताना दिसतात.
मात्र, अमेरिकेत 38 वर्षीय क्रिस टेरेलने जंक फूड आणि त्याच्या आवडत्या गोष्टी खाऊनही 57 किलो वजन कमी केलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीचा अवलंब करून त्याने इतकं वजन कमी केलं आणि त्यामुळंच आता त्याची कहाणी जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्रिसने आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचा खुलासा केला आहे. जंक फूड खाऊनही वजन कसं कमी करायचं हे आता प्रत्येकालाच जाणून घ्यायचं आहे.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील जोन्सबोरो इथं राहणाऱ्या ख्रिस टेरेलचं वजन तीन वर्षांपूर्वी १३१ किलो (२९० पौंड) होतं. अनेक दशकांपासून तो त्याच्या वजनाबद्दल चिंतेत होता. मग तो एका जागी बसून बराच वेळ व्हिडिओ गेम खेळायचा आणि भरपूर जंक फूड खात असे. त्याचा झोपेचा-उठण्याचा दिनक्रमही खूप वाईट होता. त्यावेळी त्याने या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि अनेक वर्षे अशीच जीवनशैली ठेवली.
खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्याचं वजन १३१ किलोपर्यंत पोहोचलं. नंतर त्याने वजन कमी करण्याचाही प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याचं वजन वाढत गेलं.
ख्रिस टेरेल वजन वाढवण्याच्या आणि क्रॅश डायटिंगच्या चक्रात अडकत असे, परंतु त्याच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. शेवटी, त्याने आपली मानसिकता बदलली आणि त्याच्या शरीरात पूर्णपणे परिवर्तन केलं.
2019 मध्ये क्रिसच्या आयुष्यात मोठा बदल झाला. या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर ख्रिस टेरेलने आपलं जीवन बदलण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम, त्याने आपली जीवनशैली निरोगी बनवण्यास सुरुवात केली आणि मानसिकता बर्याच प्रमाणात बदलली. ख्रिस पूर्वी स्वत:ला वर्काहोलिक म्हणायचा आणि जंक फूड खात असे. त्याच्या जीवनशैलीत कोणतीही शारीरिक हालचाल नव्हती.
तो योग्य वेळी झोपत नसे आणि पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत तो टीव्ही पाहायचा किंवा व्हिडिओ गेम खेळायचा. हळूहळू त्याच्या सवयी बदलल्या. त्याने आठवड्यातून तीन दिवस 20 मिनिटे पोहायला सुरुवात केली आणि खाण्यापिण्यात काही बदल केले. हळूहळू त्याचं वजन कमी होऊ लागलं. अन्न सोडण्याऐवजी त्याने वेगळी रणनीती अवलंबली. भूक लागल्यावरच तो अन्न खात असे. जेवणाचं प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी केलं. महिन्यातून एकदा वजन मोजू लागला. त्याने आपली बैठी नोकरी आणि गर्लफ्रेंड सोडली कारण त्याचा ताण वाढत होता.
ख्रिस टेरेलने एका मुलाखतीत सांगितलं की, या चांगल्या सवयींमुळे पहिल्या सहा महिन्यांत त्याचं वजन सुमारे 13 किलो (30 पाउंड) कमी झालं. यानंतर, त्यानं सतत अन्नाचं प्रमाण कमी ठेवलं, परंतु त्याच्या आवडत्या गोष्टी खाल्ल्या. त्याने पिझ्झा-बर्गरसह सर्व जंक फूड खाल्लं, पण पूर्वीपेक्षा खूपच कमी प्रमाणात. याशिवाय, रोज खूप जंक फूड न खाल्ल्याने जीवनशैली सुधारली.
अशाप्रकारे पुढील दोन वर्षांत त्याने सुमारे 44 किलो वजन कमी केलं. 2019 मध्ये, ख्रिस टेरेलने वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला आणि सुमारे अडीच वर्षांत, त्यानं सुमारे 57 किलो वजन कमी करून स्वतःला पूर्णपणे बदललं. ख्रिसचा असा विश्वास आहे की वजन कमी करण्यासाठी तुमच्या आवडत्या गोष्टी पूर्णपणे सोडून देण्याऐवजी तुम्ही अधूनमधून खावे आणि जंक फूडचे प्रमाण कमी करावे. याशिवाय निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे आणि तणाव टाळला पाहिजे.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.