Yoga Lifestyle- केवळ सुर्यनमस्कार घाला आणि व्हा फिट, Surya Namaskar चे आहेत अनेक फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुर्यनमस्काराचे फायदे

केवळ सुर्यनमस्कार घाला आणि व्हा फिट, Surya Namaskar चे आहेत अनेक फायदे

निरोगी राहण्यासाठी तसचं मानसिक स्वास्थ Mental Health जपण्यासाठी योगसाधना किंवा योगाला मोठं महत्व आहे. शरीर बळकट करण्यासोबत मानसिक ताण दूर करण्यासाठी योगा फायदेशीर ठरू शकतो. Marathi Health Tips Why Surya Namaskar Important for Physical and Mental Health

भारतातच नव्हे तर आता परदेशातही अनेकजण आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योगाला Yoga पसंती देत आहेत. नियमित योगा केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून Illness मुक्तता मिळवू शकता. 

नियमित योगा करायचा म्हटलं तर योगाभ्यास शिकणं किंवा विविध आसनं करता येणं गरजेचं असतं. मात्र तुम्ही केवळ सुर्यनमस्कार Surya Namaskar घालूनही अनेक समस्या दूर करू शकता

सुर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. यामध्ये पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो. १२ आसनं आणि १० अवयवांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या आसनामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. शिवाय तणाव दूर होण्यासही मदत होते. 

नियमितपणे केवळ १०-१५ मिनिटं किंवा केवळ ११ सुर्यनमस्कार योग्यरित्या केल्याने तुमच्या अनेक आरोग्याच्या समस्या दूर होऊन शरीराला अनेक फायदे मिळतील. तुम्हाला इतर व्यायाम किंवा योगा करण्याचीही आवश्यकता भासणार नाही. तेव्हा जाणून घेऊयात सुर्य नमस्काराचे फायदे. 

पचन सुधारतं- नियमित सुर्यनमस्कार केल्याने पचनसंस्थेचं कार्य सुधारण्यास मदत होते. तसचं पचनसंस्थेत रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. सुर्यनमस्कारामुळे आतड्यांचं कार्य देखील सुधारत. तसचं गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सुर्यनमस्कार फायदेशीर आहेत.

शरीर डिटॉक्स करण्यास मदत- सुर्यनमस्कार करताना योग्यरित्या श्वासोच्छवास घेणं गरजेचं आहे. यामुळे आसन करताना हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचते. परिणामी रक्तामध्ये आॅक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि शरीरातील कार्बनडॉक्साईड आणि इतर विषारी वायू बाहेर पडण्यास मदत होते. सुर्यनमस्कारामुळे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते. 

हे देखिल वाचा-

मणका बळकट होतो- अलिकडे कार्यालयातील एकाच जागी तासनतास बसून केल्या जाणाऱ्या कामांमुळे पाठीच्या कण्याचे अनेक आजार उद्भवू लागले आहेत. यासाठी सुर्यनमस्कार हे एक उत्तम योगासन आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीरासोबत पाठीच्या मणक्याला बळकटी मिळते.

सुर्यनमस्कार घालताना संपूर्ण शरीराचं स्ट्रेचिंग होत असल्याने स्नायू आणि लिगामेंट देखील मजबूत होतात. तसचं कंबरही लवचिक होते. 

पोट आणि मजन कमी हाईल- नियमित सुर्यनमस्कार घातल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. डाएटिंगहून अधिक जलद जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सुर्यनमस्कार हा एक उत्तम मार्ग आहे. शिवाय यामुळे पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होईल. 

ग्लोइंग त्वचा- दररोज सुर्यनमस्कार घातल्याने रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवर चमक येते. तसचं त्वचेसंबधीच समस्या दूर होतात. सुर्यनमस्कारामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होवून तुम्ही तरुण दिसू लागता. तरुण दिसण्यासाठी नियमित ११ सुर्यनस्कार घालणं फायदेशीर ठरू शकतं. 

मानसिक आरोग्य सुधारतं. – सध्याच्या ताण तणावपूर्ण जीवनात मानसिक आरोग्य जपण्यासाठी सुर्यनमस्कार फायद्याचे आहेत. सुर्यनमस्कारांमुळे नर्वस सिस्टम आणि स्मरणशक्ती सक्षम होण्यास मदत होते. सकाळच्या वेळी सुर्यनमस्कार घातल्याने चिंता आणि तणाव दूर होवून मानसिक आरोग्य चांगलं राहतं. 

मासिक पाळीतील समस्या दूर होतील- नियमित सुर्यनमस्कारामुळे अनियमित पाळीची समस्या दूर होईल. सुर्यनमस्कारामुळे पोटाचे स्नायू मजबूत झाल्याने मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. तसचं यामुळे ब्लड फ्लो कमी होण्यासही मदत होते. 

या काही महत्वाच्या फायद्यासोबतच सुर्य नमस्कारामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होते. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, थायरॉइड्चा समस्या दूर करण्यासाठी सुर्यनमस्कार फायदेशीर ठरतं. 

हे देखिल वाचा-

या व्यक्तींनी सुर्यनमस्कार घालू नये

-गर्भवती महिलांनी सुर्यनमस्कार घालू नये.

- हार्निया आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती

- पाठीचं दुखणं किंवा इतर समस्या असेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा तज्ञांच्या सल्ल्याने सुर्यनमस्कार घालावेत

टॅग्स :yogaYoga Lifestyle