Footwear घेताना  गोष्टींकडे द्या लक्ष, पायांना मिळेल आराम

दिवसभरातील वावर किंवा तुमचा प्रवास चांगला व्हावा यासाठी योग्य फूटवेअर Foot ware निवडणं अत्यंत गरजेचं आहे
योग्य फूटवेअर निवडा
योग्य फूटवेअर निवडाEsakal

चपला, बूट किंवा सॅण्डल म्हणजेच आपले फूट वेअर Footwear हे केवळ फॅशनसाठी नसून त्यांचं आपल्या रोजच्या आयुष्यातील महत्व खूप खास आहे. आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या पायांवर असतो. दिवसभर चालणं किंवा उभं राहण तसचं जिने चढ-उतर करणं अशा अनेक क्रिया आपण दिवसभरात करत असतो. या सगळ्यात महत्वपूर्ण असतात ते आपले फूट वेअर म्हणजेच पादत्राणं. Marathi Tips Choose right foot ware for legs health

दिवसभरातील वावर किंवा तुमचा प्रवास चांगला व्हावा यासाठी योग्य फूटवेअर Footwear निवडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण चुकीच्या चपला Chappals किंवा बूटांमुळे देखील तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खास करून ट्रेकिंग Trekking किंवा तुम्ही कुठे फिरायला जात असला. तसचं तुमचं रोज जास्त चालणं होत असेल तर त्यासाठी योग्य फूट वेअरची निवड करावी. 

प्रवासात योग्य फूट वेअर असणं गरजेचं

डॉक्टरांच्या मते जर तुम्ही योग्य फूट वेअर म्हणजेच चपला किंवा बूट घालत नसाल तर तुमच्या गुडघ्यांवर, नितंबांवर आणि पाठीच्या खालच्या भागावर दबाव निर्माण होवू शकतो. यामुळे पायांमध्ये वेदना होवू शकतात. तसचं सतत उंच टाचांच्या सॅण्डल घातल्याने सांधेदुखी सारखा आजार सुरू होवू शकतो. 

तसच जेव्हा तुम्ही उंच टाचांची किंवा चुकीची चप्पल घालता तेव्हा तुमची चालण्याची पद्धत बदलते. यामुळे बॉडी पोश्चरवर परिणाम होतो. तसचं यामुळे पायांच्या बोटातील कॉर्न्स आणि कॉलस या हाडांच्या सांध्यावर परिणाम होवून वेदना होतात. तसचं तुमच्या बोटांची रचना देखील बिघडू शकते. 

हे देखिल वाचा-

योग्य फूटवेअर निवडा
Leg Swelling : तुमचेही दररोज पाय सुजतात? औषधी घेण्यापूर्वी एकदा 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

योग्य फूट वेअर न वापरल्याने होणाऱ्या समस्या

- जर तुम्ही चुकीच्या चपला वापरत असाल तर पायांमध्ये वेदना होवू शकतात. 

- जास्त वेळ चुकीचे बूट किंवा सॅण्डल्स घातल्याने पायाना सूज येणं तसचं पाय जड होणं आणि नसांवर ताण येणं अशा समस्या निर्माण होवू शकता. 

- जर तुमच्या बुटांमधील सोल आरामदायक नसेल तर पायांना खाज येणं, रॅश किंवा पाय लाल होण्याची समस्या निर्माण होवू शकते. 

- चुकीचे फूट वेअर घातल्याने अनेकांना ब्लड क्लॉटिंगची समस्या निर्माण होते. 

- तसच रक्त प्रवाह बिघडल्याने थ्रबोयसिस किंवा पाय सुन्न होण्यासारखी समस्या उद्भवू शकते. 

या समस्या टाळण्यासाठी योग्य फूटवेअरची निवड करणं गरजेंचं आहे. ही निवड कशी करावी. 

१. जर तुम्हाला पायांसंबधी कोणतीही समस्या असेल तर उंच टाचांच्या चप्पलांचा वापर आधी बंद करा.

२. शूज निवडताना बुटाच्या मागच्या बाजूला असलेला आर्क टाचेवर बसेल असा असावा.  अन्यथा टाचेची त्वचा घासत राहिल आणि तुम्हाला आराम मिळणार नाही. 

३. बुटांचा किंवा चपलांचा आउटर सोल म्हणजेच जमिनीला चिटकणारा भाग जास्त पातळ नसावा. यामुळे जमिनिवरील दगड, खडी यांपासून पाय सुरक्षित राहतील आणि चालायला त्रास होणार नाही. 

४. तसच चप्पलांचा सोल हा चालण्याच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे हा सोल योग्य आहे ना हे पाहूनच फूट वेअर निवडावं.

हे देखिल वाचा-

योग्य फूटवेअर निवडा
Black Thread In Leg : पायात काळा दोरा का बांधतात माहितीये? काय आहे त्याचे फायदे वाचा

५. शूज किंवा सॅण्डल, चप्पल निवडताना ती लवचिक असणं गरजेचं आहे. कारण लवचिक फूट वेअरमुळे चातनाना पायांना आराम मिळतो. 

६. तसचं तुम्हाला बुटांच्या टो बॉक्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. टो बॉक्स म्हणजे शूजचा पुढील भाग जिथे तुमचा पंजा आणि बोट फिट बसतात. बोट जास्त दाबली जातील किंवा दुमडली जातील असे बूट निवडू नये. 

७. बूट किंवा शूज खरेदी करण्यासाठी संध्याकाळची वेळ निवडावी. कारण दिवसभरातील प्रवास किंवा हालचालींमुळे संध्याकाळी पायांवर हलकी सूज आलेली असते. त्यामुळे सकाळ ऐवजी संध्याकाळी बूटांचं योग्य माप मिळू शकतं. 

८. तसच जड बूट निवडण्याएवजी वजनाने हलकी असलेली बूट निवडा. 

९. उन्हाळ्यासाठी खास करून कॉटन शूज निवडावे. ज्यातून हवा आत बाहेर झाल्याने ब्लड सर्क्युलेशन होईल. आणि पायांना त्रास होणार नाही. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पायाच्या मापानेच बुटांची खरेदी करा. कारण थोडं लहान किंवा मोठ्या मापाच्या बुटांचा सतत वापर केल्याने देखील पायांना त्रास होवू शकतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com