Marriage Tips : लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला कसं करावं खूश? जाणून घ्या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage Tips : लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला कसं करावं खूश? जाणून घ्या टिप्स

Marriage Tips : लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला कसं करावं खूश? जाणून घ्या टिप्स

Marriage Tips : लग्नानंतर पती-पत्नी एकत्र राहण्यास सुरुवात करतात. त्यानंतर त्यांना एकमेकांची सवय लागते. ओढ, प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आतुरता अशा सर्व गोष्टी नात्यात येतात. मात्र, या सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी शारिरीक संबंध म्हणजेच सेक्स देखील महत्त्वाचे असते.

हेही वाचा: Marriage: लग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल

जेवढे तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घ्याल तितके तुमचे नाते घट्ट होते. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना नेमके काय हवे असते, त्यांना खूश कसे कराल, हे जाणून घ्या.

हेही वाचा: Arrange Marriage करताय? असे जिंका पार्टनरचे मन

पहिल्या रात्री या गोष्टी करा

  • गिफ्ट द्या

तुमच्या जोडीदाराशी संवाद करण्यापूर्वी तिला एखादे गिफ्ट द्या. यामध्ये तुम्ही सुगंधी फुले, गजरा, ड्रेस किंवा साडी देऊ शकता.

हेही वाचा: Marriage : बायकोला लागली सरकारी नोकरी आणि नवऱ्याला म्हणते, "तू कोण ?"

  • संवाद साधावा

दोघांनाही एकमेकांना समजून घेणे फारच गरजेचे असते. याकरता दोघांमध्ये संवाद होणे गरजेचे असते. मुलीला सुरुवातीला आपला नवरा हा एकच आपला हक्काचा व्यक्ती वाटत असतो. ती त्याच्यात पती ऐवजी आपला मित्र मिळेल, अशी तिची अपेक्षा करते. त्यामुळे संवाद साधावा.

हेही वाचा: Love Marriage नंतरही घटस्फोट का होतो? ही आहेत ४ कारणे

  • भावनिक जवळीक करा

तिला आपलेसे करा. तिची काळजी घ्या. सतत तिला काय हवे, नको याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. यामुळे तिच्या मनात तुमच्याविषयी एक वेगळीच भावना निर्माण होते. आणि तिला आपला नवरा काळजी घेतो हे पाहून फार बरे वाटते.

हेही वाचा: Happy Love Marriage हवयं? जाणून घ्या, लग्नानंतर नातं जपण्याचा कानमंत्र

  • कौतुक करा

तिच्या मनातील भिती काढून टाकण्यासाठी तिच्याशी दिलखुलास गप्पा मारा. तिचे कौतुक करा. ती किती सुंदर आणि सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवून द्या. यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, आणि ती तुमची कधी नकळत होऊन जाईल हे तुम्हालाही कळणार नाही.

हेही वाचा: Marriage Certificate: तुम्ही विवाह नोंदणी केलीये?

  • आवडी-निवडी जाणून घ्या

गप्पा मारत असताना दोघांनीही एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्या. आपल्या पत्नीला काय आवडते? काय आवडत नाही या गोष्टींची माहिती जाणून घ्या. यामुळे तुमच्या नात्यात अधिक जवळीकता येण्यास मदत होईल.

हेही वाचा: KL Rahul-Athiya Shetty Marriage : अथिया शेट्टी अन् केएलचं 'शुभमंगल डेस्टिनेशन' ठरलं

  • सेक्सची घाई नको

सर्वप्रथम तुमच्या पार्टनरला विश्वासात घ्या. स्वप्न रंगवा. तुम्ही तिची आयुष्यभर साथ देणार असा विश्वास द्या. सेक्सची घाई करू नका.

हेही वाचा: Shruti Haasan Marriage Plan: लग्न करण्यास का घाबरते श्रृती हासन ? नेमकं काय आहे प्रकरण ?

  • सौम्य फोरप्ले

तुमचा पार्टनर तयार आहे का याचा अंदाज घ्या आणि त्यानंतर पुढे जा. कारण लग्नाच्या पहिल्या रात्री पुरुषाला सेक्स करण्याची इच्छा असते. मात्र, त्याआधी तुम्ही तुमच्या जोडीदाराची परवानगी घ्या. याकरता आधी तिला प्रेमाने जवळ घेऊन तिला अलगद स्पर्श करा. सुरुवातीला फोरप्लेने सुरुवात करा आणि तिला खूश करा. मात्र, तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करु नका.

Web Title: Marriage Tips First Night How To Make Wife Happy Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marriage