Married Tradition: लग्नाआधीच एकत्र राहणं अन् लग्नासाठी दुसऱ्याची बायको पळवणं, आदिवासींच्या लग्नाच्या अनोख्या परंपरा

नवऱ्याच्या बरोबरीने नवरीही उंटावर बसून रडत पण मिरवत सासरी जाते
Married Tradition
Married Traditionesakal

Married Tradition:

लग्न म्हटलं की हळदी, मेहंदी, संगीत, लग्नानंतरचे खेळ, रंगपाणी या अशा सगळ्या आनंददायी उत्सवात लग्न सोहळा पार पडतो. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे रोज एखाद्याच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी उपस्थित रहावे लागते. पण जगात आजही काही आदिवासी लोक राहतात ज्यांचे लग्नाबाबतचे विचार अगदी वेगळे आहेत.

आदिवासी लोक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहणं पसंत करतात.  कारण, त्यांना निस र्गात रमणं चांगलं वाटतं. आपल्या पुढारलेल्या समाजात लग्नाचा बडेजाव, दिखावा अन् लग्नावर अफाट खर्च केला जातो. पण अशा सगळ्या वातावरणात अदिवासी लोकांच्या परंपरा वेगळा आदर्श निर्माण करतात. (Adivasi People)

Married Tradition
Religion and Tradition : पूजेच्या वेळी कलश का ठेवला जातो? काय आहे त्याचं महत्त्व...

आज आपण अशाच काही आदिवासी जमातींच्या वेगळ्या प्रथा आणि परंपरांची माहिती घेणार आहोत. ज्या तुमच्यासाठी नक्कीच वेगळ्या असतील. तुम्ही त्या या आधी कधीच पाहिल्या नसतील.

दक्षिण आफ्रिकेतील वोदाब्बे जमातित लग्न करण्याची परंपरेचा कोणी विचारही केला नसेल. कारण, एखाद्याची बायको चोरून पळवून घेऊन जाऊन लग्न केलं जातं. म्हणजेच, एखाद्या तरूणाला लग्न करायचे असेल तर त्याने दुसऱ्याची पत्नी पळवून घेऊन जावी अन् तिच्यासोबत लग्न करावं. यात असंही आहे की, पहिलं लग्न घरच्यांच्या पसंतीने अन् दुसऱ्या लग्नासाठी दुसऱ्याची पत्नी पळवून आणावी.

Married Tradition
Nashik Wedding Tradition : गाव करील ते राव काय करील! येथे आहे लग्नसोहळ्याची अनोखी पद्धत...

असं केलं तरच इथे दुसऱ्या लग्नाची परवानगी आहे. इथे असे करण्याला गुन्हा मानलं जात नाही. कारण इथे लग्न अशीच केली जातात. हीच त्यांची लग्नाची परंपरा आहे. 

आधी कुटुंबाला द्यावे लागते वचन

राजस्थानमधील अंचल डुंगरपूरमधील लग्नावेळी लग्न सोहळ्यात जेव्हा वराची वरात येते. तेव्हा सर्वात आधी मुलीच्या कुटुंबियांशी त्याची गाठ पडते. मुलीकडील लोक त्याच्याकडून वचन घेतात की तो त्यांच्या मुलीला सुखात ठेवेल. त्याने वचन दिले तरच त्याला लग्न करू दिले जाते.

Married Tradition
Nashik Wedding Tradition : गाव करील ते राव काय करील! येथे आहे लग्नसोहळ्याची अनोखी पद्धत...

उंटावरून पाठवणी

राजस्थानमधीलच एका आदिवासी समाजात घोडा नाहीतर उंटावरून नवरा नवरीची पाठवणी केली जाते. नवऱ्याच्या बरोबरीने नवरीही उंटावर बसून रडत पण मिरवत सासरी जाते. (Tradition)

Married Tradition
Marathi Tradition :  गरोदरपणाच्या कितव्या महिन्यात भरतात चोर ओटी, ओटीत केळीला स्थान का नाही?
लग्नाआधीच होणारा घोटुल मेळावा
लग्नाआधीच होणारा घोटुल मेळावाesakal

लग्नाआधीच होणारा घोटुल मेळावा

छत्तीसगडमधील माडिया समाजातील लोक वयात आलेल्या तरूण तरूणींचा मेळावा भरवला जातो. यासाठी गावातच असलेल्या एका ठिकाणी मोठा वाडा सजवला जातो.  तिथे लग्नाला आलेल्या तरूण-तरूणींना राहण्यासाठी ठेवले जाते. ही मुले नाचतात, त्यांची पारंपरिक गाणी म्हणतात. गप्पा मारतात यामुळे ते एकमेकांना समजून घेऊन जोडीदाराची निवड करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com