Met Gala 2024 :  Met Gala मध्ये पाहुण्यांसाठी बनवल्या या स्पेशल डिश, फक्त हे तीन पदार्थ होते बॅन?

या वर्षी कार्यक्रमासाठी सिझनेबल पदार्थांवर लक्ष केंद्रित केले गेले होते
Met Gala 2024
Met Gala 2024 esakal

Met Gala 2024 : 

सध्या सर्वांच्याच तोंडात Met Gala 2024 चीच चर्चा आहे. सोशल मिडिया उघडताच आवडत्या अभिनेत्री, बिझनेस टायकून्सचे फोटो पेजवर दिसायला लागतात. ते फोटो पाहून मन अगदी प्रसन्न होत आहे.

Met Gala 2024 मध्ये ईशा अंबानी, सुधा रेड्डी या बिझनेसवुमन्सच्या लुक्सने हवा केली आहे. तर अनेक अभिनेत्रींनी सुंदर लुक्स करत यात हजेरी लावली होती. ज्या कार्यक्रमाची इतकी चर्चा रंगलीय त्यात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी काय मेन्यू बनवण्यात आला होता, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

Met Gala 2024
Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

आज आपण Met Gala मध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्पेशल पदार्थ ठेवण्यात आले होते.  मेट गालाच्या थीमनूसार शेफ ऑलिव्हर चेंग याने 'स्लीपिंग ब्युटी: रीवॉकिंग फॅशन' या थीमशी परिपूर्ण एक मेन्यू तयार केला आहे.  

तिने स्वत: Met Gala येथे त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या डिनर मेनूबद्दल माहिती पोस्ट केली आहे. या वर्षी कार्यक्रमासाठी सिझनेबल पदार्थांवर लक्ष केंद्रित केले गेले होते. जे "स्लीपिंग ब्युटीच्या काल्पनिक जगतातील पहिरवेगार गालिचे आणि स्वप्नवत पदार्थ यावर बेस्ड होते. 

Met Gala 2024
Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

डिनरच्या सुरुवातीला असलेल्या स्टार्टरमध्ये स्प्रिंग व्हेजिटेबल सॅलेड देण्यात आले होते. यामध्ये ऑलिव क्रम्बल, फुलपाखराच्या आकारातील क्राउटन, बिगफ्लॉवर फोम आणि रास्पबेरी विनॅग्रेटचा समावेश आहे. (Met Gala 2024)

मेन कोर्समध्ये टोर्टेलिनी रोज से टॉप्ड बिफ नॉनव्हेज पदार्थ होता, जे एका महालासारखे दिसत होते. या डिनर पार्टीमध्ये आमंत्रण पत्रिका, मेन्यू कार्ड, नॅपकिन आणि टेबल सेटअप सगळेच या थीमला धरून बनवण्यात आले होते.  

Met Gala 2024
Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

स्वीटमध्ये स्नो व्हाईट यास्टोरीतील ऍपल देण्यात आले. हे सफरचंद बदाम, अक्रोडचा वापर करण्यात आला होता. याशिवाय दरवर्षीप्रमाणे याही वेळी मेट गालाच्या डिनर मेनूमध्ये तीन खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली होती.

यावेळी देखील, कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पाहुण्यांना चाइव्स, कांदे आणि लसूणपासून बनवलेले पदार्थ चाखायला मिळाले नाहीत. कारण ते खाल्ल्यानंतर आपल्या तोडाला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. तो वास या स्वप्नवत दुनियेत बाधा आणेल असे वाटल्याने त्यावर बंदी घालण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com