घर खरेदी करण्यासाठी 'मुंबई' जगातील सर्वात कमी आनंदी ठिकाण!

mumbai survey
mumbai surveyesakal

मुंबई : मुंबई (mumbai) हे घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात कमी आनंदी ठिकाण आहे, असं एका अभ्यासातून (survey) समोर आलंय. ऑनलाइन मॉर्टगेज अॅडव्हायझर नावाच्या यूके (uk) फर्मने केलेल्या अभ्यासातून घर खरेदी करण्यासाठी ‘सर्वात आनंदी’ (happy) आणि ‘सर्वात कमी आनंदी’ (unhappy) ठिकाणे उघड झाली आहेत.

घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात कमी २० आनंदी शहरे’ सापडली

मुंबईत आपलं स्वतःचं घर असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. “ज्यांनी अलीकडेच घर खरेदी केले आहे, त्यांच्या आनंदाची पातळी कशी आणि किती आहे, हे शोधण्यासाठी या फर्मने अभ्यास सुरू केला. या फर्मला ‘घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात कमी २० आनंदी शहरे’ सापडली. या यादीत मुंबई एक नंबरवर आहे, तर, गुजरातमधील सूरत शहर पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीतील इतर शहरांमध्ये अमेरिकेतील अटलांटा आणि इटलीतील नेपल्सचा समावेश आहे.

mumbai survey
तीन वर्षात २०० हून अधिक विमानतळांचे नेटवर्क होणार - PM मोदी

फेशिअल रेकग्निशन टूलने स्कॅनरच्या आधारे माहिती

यावेळी युकेतील या फर्मने त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अधिक माहिती दिली आहे. ते सांगतात “ #selfie आणि #newhomeowner हॅशटॅगसह पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम युजर्सचे फोटो स्कॅन करत पोस्ट्सच्या क्रमवारीनुसार अभ्यास सुरू केला.आमच्या विश्लेषणातील प्रत्येक फोटो मायक्रोसॉफ्ट अझूर फेशिअल रेकग्निशन टूलने स्कॅन केला गेला. मायक्रोसॉफ्ट अझूर चेहऱ्याच्या स्पष्ट फोटोंचे विश्लेषण करते आणि फोटोतील विविध भावनांच्या पातळीचा स्कोअर आपोआप दर्शवते. यामध्ये राग, तिरस्कार, भीती, आनंद, दुःख, आश्चर्य आणि तटस्थ हावभाव इत्यादी प्रकारच्या भावना ओळखता येतात.” प्रत्येक शहरातील घर खरेदीदारांच्या सरासरी आनंदाची पातळी आणि घर खरेदीदारांच्या सरासरी जागतिक आनंदाच्या पातळीमधील टक्केवारीच्या फरकाच्या आधारावर ही माहिती गोळा केल्याचे फर्मने सांगितले.

mumbai survey
फेसबुक नाव बदलण्याच्या तयारीत, काय आहे कारण?

घर खरेदी करण्यासाठी 'ही' सर्वात आनंदी शहरे

दुसरीकडे या फर्मने घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात आनंदी शहरांची यादी देखील आणली आहे. विशेष म्हणजे भारतातील पाच शहरांना या यादीत स्थान मिळाले असून चंदीगड पाचव्या स्थानावर आहे. जयपूर (१०), चेन्नई (१३), इंदूर (१७) आणि लखनौ (२०) ही भारतीय शहरे घर खरेदी करण्यासाठी क्रमवारीनुसार सर्वात आनंदी शहरे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com