Navratri 2023 : रायता,टिक्की आणि बरंच काही; अवघ्या ५ मिनिटात तयार होतात उपवासाचे हे पदार्थ

भगर, वरी सोडून वेगळं काही हवं असेल तर हे नक्की ट्राय करा
Navratri 2023 : रायता,टिक्की आणि बरंच काही; अवघ्या ५ मिनिटात तयार होतात उपवासाचे हे पदार्थ

Navratri 2023 :  हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अंबामातेचे भक्त या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. या उत्सवात नऊ दिवस दुर्गा मातेची पूजा केली जाते. देवीची खऱ्या मनाने पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते. तसेच भाविक नऊ दिवस उपवास करतात.

उपवासाच्या वेळी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही पोट भरणारे बटाटे खाऊ शकता. बटाटा वापरून अनेक प्रकारच्या रेसिपी बनवता येतात. ज्या उपवासात शरीराला उत्साही ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसेच ज्या लोकांना नवं काही खायचं आहे त्यांच्यासाठीही या बेस्ट आहेत.

Navratri 2023 : रायता,टिक्की आणि बरंच काही; अवघ्या ५ मिनिटात तयार होतात उपवासाचे हे पदार्थ
Rajma Tikki Chaat Recipe: बटाटा नव्हे तर राजमाचा वापर करुन बनवा चविष्ट टिक्की चाट, जाणून घ्या रेसिपी

बटाट्याचा रायता

बटाटा हा उपवासात खाल्ला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे. उपवासात बटाट्याचा रायता खाऊ शकता. हे बनवायलाही खूप सोपे आहे. रायता बनवण्यासाठी, उकडलेले बटाटे मॅश करा, नंतर फेटलेल्या दह्यात बटाटे घाला. आता त्यात काळी मिरी, खडे मीठ मिसळा आणि हिरव्या कोथिंबीरीने सजवा.

Navratri 2023 : रायता,टिक्की आणि बरंच काही; अवघ्या ५ मिनिटात तयार होतात उपवासाचे हे पदार्थ
Potato Chips Recipe: तेलात अजिबात फ्राय न करता झटपट बटाटा वेफर्स बनवा, पाहा रेसिपी

बटाटा टिक्की

संध्याकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही स्वादिष्ट बटाट्याच्या टिक्की खाऊ शकता. हे करण्यासाठी, मॅश केलेल्या उकडलेल्या बटाट्यांमध्ये रॉक मीठ मिसळा, नंतर पॅन गरम करा आणि तेल घाला, आता टिक्की दोन्ही बाजूंनी फ्राय करा. हे तुम्ही चहासोबत खाऊ शकता.

Navratri 2023 : रायता,टिक्की आणि बरंच काही; अवघ्या ५ मिनिटात तयार होतात उपवासाचे हे पदार्थ
Navratri 2023: नवरात्रीचे उपवास करताय का? मग बनवा हे हेल्दी-टेस्टी स्नॅक्स, पाहा या जबरदस्त रेसिपी...
तुम्ही स्वादिष्ट बटाट्याच्या टिक्की खाऊ शकता
तुम्ही स्वादिष्ट बटाट्याच्या टिक्की खाऊ शकताesakal

बटाट्याचा शिरा

जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही बटाट्याचा शिरा देखील ट्राय करू शकता. हे बनवण्यासाठी उकडलेले बटाटे तुपात तळून त्यात दूध, साखर घालून हे मिश्रण चांगले मॅश करा. ते तयार झाल्यावर ड्रायफ्रुट्सने सजवा. (Recipe)

Navratri 2023 : रायता,टिक्की आणि बरंच काही; अवघ्या ५ मिनिटात तयार होतात उपवासाचे हे पदार्थ
Sawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमा नेमकी कधी आहे 30 की 31 ऑगस्ट? जाणून घ्या कोणत्या दिवशी करावा उपवास
बटाट्याचा शिरा
बटाट्याचा शिराesakal
Navratri 2023 : रायता,टिक्की आणि बरंच काही; अवघ्या ५ मिनिटात तयार होतात उपवासाचे हे पदार्थ
Nashik Market Watch: सह्याद्री रुग्‍णालयात दुसरी कॅथलॅब लवकरच! 10 वर्षांत 30 हजार हृदय प्रक्रिया, शस्‍त्रक्रिया

दही बटाटा

उपवासात जास्त तेलकट खायचे नसेल तर उकडलेल्या बटाट्यात दही मिसळा आणि त्यात खडे मीठ टाका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि भाजलेले जिरे पूड देखील वापरू शकता. स्वादिष्ट दही बटाटा तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com